‘पर्यावरणाच्या परिघात’ लवकरच वाचकांच्या हाती; वर्षां गजेंद्रगडकर यांचा एकहाती प्रकल्प

विद्याधर कुलकर्णी

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…

पुणे : निसर्ग आणि पर्यावरणविषयक सुमारे बाराशे संज्ञा-संकल्पनांची उकल करणारा अभ्यासपूर्ण संदर्भग्रंथ लवकरच वाचकांच्या हाती येत आहे. पर्यावरणविषयक लेखन करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका वर्षां गजेंद्रगडकर यांनी राज्य साहित्य संस्कृती मंडळासाठी हा प्रकल्प साकारला आहे.  खरं तर ‘बृहद प्रकल्प’ असे मी त्याला म्हटले आहे. कोशाची सर्व परिमाणे त्याला लागू असतील असे नाही, पण निसर्ग व पर्यावरणविषयक संज्ञा आणि संकल्पना आणि विशेषत: भारतीय उपखंडाच्या संदर्भात, असे त्याचे स्वरूप आहे.

भारतीय उपखंडाला केंद्रस्थानी ठेवून या संज्ञा-संकल्पनांचे मराठीमध्ये संकलन केले आहे. एरवी कोशामध्ये तथ्यात्मक तसेच वस्तुस्थितीपूर्ण माहिती असते. या संदर्भ ग्रंथामध्ये संकलन, स्पष्टीकरण, विश्लेषण आणि उदाहरण याच्यासह सर्व संज्ञा-संकल्पनांचे संकलन केले आहे, असे वर्षां गजेंद्रगडकर यांनी सांगितले.

गेली २५ वर्षे मी पर्यावरणविषयक लेखन करीत आहे. अनेकदा संज्ञा-संकल्पना मराठीमध्ये स्पष्ट करताना गोंधळ होतो हे जाणवले. वेदर आणि क्लायमेट असे म्हणताना हवा आणि हवामान नेमके कशाला म्हणायचे याबाबत गोंधळ असतो. अनेकदा संकल्पनांना मराठीमध्ये काय म्हणतात हे माहीत नसते किंवा माहीत असले तरी शब्द वापरला जात नाही. शब्द वापरला जात नाही म्हणून सामान्य माणसाला ते कळत नाही. त्यामुळे काही संज्ञा-संकल्पना मराठीमध्ये आणल्या पाहिजेत किंवा काही शब्द मराठीमध्ये रुढ केले पाहिजेत, असे जाणवले. दोन वन्य प्रदेशांना जोडणाऱ्या भागाला ‘कॉरिडॉर’ असे म्हटले जाते. त्यासाठी मी ‘आंतरमार्ग’ हा शब्द वापरला आहे. काही संज्ञा नव्याने रुढ केल्या आहेत, तर काही संज्ञा आहेत त्याच वापरल्या आहेत, असे गजेंद्रगडकर यांनी सांगितले. 

गजेंद्रगडकर म्हणाल्या,की अनेक ठिकाणी स्थानिक भाषेमध्ये वेगवेगळे शब्द असतात. त्यामुळे एखादी संज्ञा स्पष्ट करताना या सर्व शब्दांचा पर्याय देण्यात आला आहे. मराठीमध्ये काही संज्ञा रूळवायला हव्यात आणि काही नव्याने आणण्याची गरज आहे. सामान्य माणसे, विद्यार्थी, निसर्गप्रेमी आणि मराठीमध्ये लिहू इच्छिणारे काही लेखक अशा सर्वाना या संदर्भ ग्रंथाचा उपयोग होईल. यामध्ये दिलीप कुलकर्णी, डॉ. श्री. द. महाजन, मारुती चितमपल्ली, डॉ. प्रकाश गोळे अशा पूर्वसुरींच्या कामाचा उपयोग झाला आहे.

कोशाचा प्रकल्प साकारण्यासाठी विविध अभ्यासक एकत्र येतात. मी एकटीनेच हा प्रकल्प साकारण्याचे ठरविल्यामुळे तो पूर्णत्वास जाण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. काही अभ्यासकांशी बोलून शंकांचे निरसन करून घेतले. पण, नोंदींच्या लेखनाचे काम मी एकटीनेच केले. त्यामुळे या कामामध्ये एकजीनसीपणा आला आहे.

– वर्षां गजेंद्रगडकर, पर्यावरण लेखिका

Story img Loader