बारामती : – वनविभागातील प्राण्यांचे पाण्याअभावी हाल होऊ नये या उद्देशाने येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बारामती मधील पाणवट्यामध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. जागतिक वनीकरण दिन, जागतिक जलदिन व जागतिक हवामानदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम एन्व्हायरमेंटल ऑफ फोरमच्या वतीने राबविण्यात आला.
उन्हाची तीव्रता सध्या खूप वाढू लागल्याने आता वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. यावर मात करण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणेच बारामतीतील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीवांसाठी टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे, या उपक्रमांतर्गत बारामती तालुक्यातील तांदुळवाडी नजिकच्या दोन पाणवठयात टँकरद्वारे पाणी सोडले गेले.
बारामती तालुक्याच्या वनविभागात पारवडी, शिर्सुफळ, नारोळी, वढाणे, मोढवे, मुढाळे, साबळेवाडी आदी ठिकाणी जवळपास १९ पाणवठे आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात एन्व्हायरमेंटल फोरमच्या वतीने या पाणवठ्यात टँकरने पाणी सोडले जाते. यंदाही आवश्यकते नुसार आणि वनविभागाच्या सूचनां नुसार पानावढ्यात येन उन्हाळ्यात पाणी सोडले जाणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्ष्याचे युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामती मधील तांदुळवाडी येथील ज्येष्ठ नागरिक निवासामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापण्यात आला, तसेच ज्येष्ठ नागरिकांना या वेळी केकचे वाटप केले गेले.