कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याचे दावे करणाऱ्या राज्यासह देशातील आरोग्य यंत्रणांच्या डोळ्यांत अंजन घालणारी माहिती करोनानंतर करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणांमधून समोर येत आहे. महाराष्ट्र राज्यातील १४ वर्षांखालील मुलांमध्ये कुष्ठरोगाचे नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली असून त्यामुळे करोना काळात सर्वेक्षण न होऊ शकलेल्या आजारांची छाया आपल्या सभोवती असल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्यात गेल्या सहा महिन्यांत आढळलेल्या कुष्ठरोगाच्या नव्या रुग्णांपैकी पाच टक्के रुग्णसंख्या लहान म्हणजे १४ वर्षांखालील वयोगटातील मुलांची आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून भारतातील बहुतांश राज्यांमध्ये कुष्ठरोगाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण शून्यावर आल्याची माहिती देण्यात आली आहे. देशातील बहुसंख्य राज्यांमधील कुष्ठरोगाचे प्रमाण दहा हजार लोकसंख्येमागे सुमारे साडेचारपर्यंत कमी झाल्याचे या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, करोना महासाथीच्या उद्रेकामुळे दोन ते अडीच वर्षांच्या काळात रखडलेले कुष्ठरुग्णांचे सर्वेक्षण पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यातील निरीक्षणे कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन अद्याप दूर असल्याचे स्पष्ट करत आहे.

हेही वाचा : पुण्यात अब्दुल सत्तारांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन, राजीनामा न दिल्यास पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग अडवण्याचा इशारा

बाँबे लेप्रसी प्रोजेक्टतर्फे नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणांवरून २०२०-२१ मध्ये नव्याने आढळलेल्या कुष्ठरुग्णांमध्ये सर्वाधिक ३९ टक्के प्रमाण हे महिलांचे आहे. त्याखालोखाल पाच टक्के रुग्ण ही १४ वर्षांखालील लहान मुले आहेत. सुमारे २.४ टक्के रुग्णांमध्ये सहज दिसून येणारी शारीरिक व्यंग आहेत. देशपातळीवर हे प्रमाण १० लाख लोकसंख्येमागे १.१ एवढे आहे. हे प्रमाण वरवर पाहता अत्यल्प असले तरी कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याचा प्रवास अद्याप खडतर असल्याचे स्पष्ट करणारा आहे.

हेही वाचा : “अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी टीका करणं बंद करावं” ; नारायण राणेंचा टोला

कुष्ठरोगाची लक्षणे मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे या जीवाणूमुळे कुष्ठरोग होतो. त्वचेवर न दुखणारे लाल पांढरे चट्टे, बधिरपणा हे कुष्ठरोगाचे प्रमुख लक्षण आहे. कुष्ठरुग्णांच्या सांध्यांमध्ये प्रचंड वेदना होतात. कुष्ठरोगाचा संसर्ग झालेल्या त्वचेच्या भागावर जखमा होतात. त्या खोलवर गेल्याने त्या भागातील मज्जातंतू कमकुवत होतात आणि तेवढ्या भागाच्या संवेदना नष्ट होतात. लवकर निदान न झाल्यास कुष्ठरुग्णांच्या हातापायांची बोटे झडणे, शारीरिक व्यंग अशा गोष्टीही दिसून येतात. कुष्ठरोगाचा जीवाणू व्यक्तीच्या शरीरात शिरल्यानंतर कित्येक वर्षे त्याची लक्षणे दिसण्यास जातात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eradication of leprosy new infections in children under 14 years of age pune print news tmb 01
Show comments