हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
परसबाग कशी करावी, काय वनस्पती लावाव्यात, सेंद्रिय कचऱ्याची माती कशी करावी, भाजीपाला कसा लावावा, पाण्याचे नियोजन; अशा परसबागेसाठी लागणाऱ्या विविधि घटकांची माहिती आपण घेतली. आज पाहू या एक आदर्श परसबाग. बागकामाचा छंद जोपासणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला असतात. पण त्यापलीकडे जाऊन हा आनंद इतरांना घेता यावा, म्हणून अथक झटणाऱ्या सौ. आशाताई उगांवकर व श्री. दिगंबर उगांवकर हे दाम्पत्य मुलुखावेगळे आहे. गेली वीस वर्षे दोघे महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीचे खंदे कार्यकर्ते आहेत अन् गेली तीस वर्षे सेंद्रिय पद्धतीने परसबाग फुलवली आहे.
बंगल्यात आत जाताच जाणवेल काटेकोर नियोजन. दर्शनी भागात शोभिवंत झाडे, रंगीबेरंगी कॅलेडियम, विविध रंगांच्या जास्वंदी, हेलिकोनियाचे ताटवे, छोटेसे हिरवेगार लॉन, नारळाच्या झाडावर चढलेले व्हेरिगेटेड मनीप्लांट, सावलीच्या ठिकाणी भिंतीला लागून डेंड्रोबीयम, सीतेची वेणी या ऑर्किड्ससाठी केलेला हिरव्या कापडाचा चिमुकला शामियान, त्यात लटकलेली हिरवी झुंबरे, गुलाबांना ऊन हवे म्हणून गच्चीवर त्यांची खास तजवीज! आशाताईंनी बागेत वैशिष्टय़पूर्ण प्रजातींची, दुर्मिळ प्रजातींची लागवड केली आहे. विविधतेमुळे कीड नियंत्रित होते, असे त्या आवर्जून सांगतात.
गच्चीवर दोन विटांचे वाफे केले आहेत, ज्यात कोबी, फ्लॉवर, मिरच्या, टोमॅटो, वांगी, भेंडी अशा फळभाज्या लावलेल्या दिसतील. पालक, मेथी, शेपू अशा पालेभाज्यांचे वाफे दिसतील. कारली, दोडका, दुधी, घोसाळे, काकडी अशा वेलींसाठी सुबक छोटे मांडव दिसतील. ऋतूप्रमाणे फेरपालट करून ऊस, तूर, मका, हळदसुद्धा लावलेले दिसतील, तर फळभाराने लावलेले आंबा, डाळिंब, केळी, पपई लक्ष वेधून घेतील. प्रत्येक गोष्टीतून आशाताईंची सौंदर्यदृष्टी जाणवेल. पुष्परचना करणे हा त्यांचा आणखी एक छंद. त्यामुळे फुलझाडांची, फुलवेलींची खूप विविधता बागेत पाहायला मिळते. कण्हेर, चाफा, कुंद, बोगनवेल, अलमांडा, असंख्य गुलाब, मे फ्लॉवर, लिली, आयरिस हे फुलणारे कंद, बर्ड ऑफ पॅराडाईज, क्लोरोडेंड्रॉन, हायड्रानजीया, व्हर्सिना; एक ना दोन असंख्य प्रकार अन् त्यामुळेच सदाबहार बाग ही त्यांच्या परसबागेची खासियत. केवळ फुलेच नाहीत, तर जमिनीत, कुंडय़ांत, झुंबरांत लावलेली शोभिवंत पाने ही त्यांच्या बागेची सौंदर्यस्थळे आहेत. फर्नस, साँग ऑफ इंडिया, स्पायडर प्लांट, मदर इन लॉज टंग, अॅस्परॅगस हे पर्णवैविध्य छोटय़ाशा सीटआऊटचे सौंदर्य वाढवत आहते. इथे बागेतील झोपाळ्यावर बसून आपण चहाचा आनंद घेऊ शकतो अन् खऱ्या मधुमालतीचा महावेल पाहून अचंबित होतो.
झाडांची प्रकृती ओळखून त्याला योग्य जागा देणे, त्यांचे सहजीवन समजून लागवड करणे, हा दोघांचा हातखंडा. हे करताना सतत प्रयोगशीलता जाणवते. स्वत:ची बहरलेली बाग बघून मिळणारा आनंद स्वत:पुरता मर्यादित न ठेवता या दाम्पत्याने महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीतर्फे परसबाग वर्ग घेणे सुरू केले. गेली बारा वर्षे दोघांनी हे व्रत घेतले आहे. विना मोबदला संस्थेसाठी हा वसा दोघं चालवीत आहेत. त्यांच्या विरलस वृत्तीला सलाम. तीन-चार वर्षे वर्ग घेतल्यावर त्यांच्या लक्षात आले,की लोकांना या विषयी रुची आहे, पण शास्त्रशुद्ध माहिती नाही. म्हणून २०१३ साली आशाताई व दिगंबर काकांनी ‘सेंद्रिय परसबाग’ हे उपयुक्त माहिती असलेले पुस्तक लिहिले. आता याची तिसरी आवृत्ती निघत आहे. इंग्रजी भाषांतरही झाले आहे.
वाफे करणे, कलमे करणे, कचरा नियोजन, खते, किडींचा बंदोबस्त, जैव कीड सापळे, मातीचा पोत सुधारणे अशा विविध विषयांवर तांत्रिक माहिती पुस्तकात मिळते. दोघे सत्तर-ऐंशीच्या घरात, पण उत्साह अमाप. काका इंजिनिअर. त्यामुळे सगळे करायेच ते तंत्रशुद्ध. नवीन व्हर्टिकल गार्डनचे मॉडेल व न वाकता येणाऱ्यांसाठी उंच वाफ्याच्या मॉडेलचे डिझाईन केले आहे. शिरवळ येथे शिंदेवाडीत शेतकरी बायकांना, उसाची शेती करणाऱ्यांना शेवगा, आले, कडिलिंब, भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने लावण्याचे प्रशिक्षण देत आहेत. माहितीपत्रके करून देत आहेत. ग्रामपंचायतीत स्लाईड शो करत आहेत. सेंद्रिय परसबाग करणारी पुढची पिढी तयार करण्यासाठी अव्याहत झटत आहेत.
आशाताईंचा जिव्हाळा, निसर्गाचे प्रेम पदोपदी जाणवते; म्हणून तर जाई-जुई, सोनटक्का, मोगरा, टॅकोमा, व्हर्बिना सगळीच फुले दोघांच्या प्रेमात आहेत अन् या फुलांच्या प्रेमातून ऋणातून उतराई होण्यासाठी आशाताईंचे नवीन पुस्तक येत आहे ‘फुलांच्या दुनियेत’. आपण सारे परसबागप्रेमी या पुस्तकाची वाट पाहूया. दोघांनी महाराष्ट्र वृक्षसंवर्धिनी व इतर अनेक संस्थांच्या, पुण्यात व पुण्याबाहेरील परसबाग वर्गामधून अनेक विद्यार्थी घडवले आहेत. पुढेही घडवत राहतील. या परसबाग गुरूंना प्रणाम.
प्रिया भिडे
(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)