पुणे : पावसाळा पूर्व कामाअंतर्गत नालेसफाई, नाला रुंदीकरण आणि खोलीकरण तसेच पावसाळी गटारे आणि वाहिन्यांच्या स्वच्छतेची सर्व कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र पावसाळा पूर्व कामे योग्य पद्धतीने झाली की नाही, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या कालावधीतही साफसफाईची कामे सुरू ठेवण्यात येणार असून त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाकडे नागरिकांना तक्रार नोंदविता येणार असून हा कक्ष चोवीस तास कार्यान्वित राहणार आहे.

पावसाळापूर्व कामांच्या तयारीचा भाग म्हणून शहराच्या हद्दीतील विविध नैसर्गिक प्रवाह, नाले, ओढे, सांडपाणी वाहिन्या, पावसाळी वाहिन्या आणि गटारे तसेच चेंबर्सच्या साफसफाईच्या कामांना यंदा मार्च महिन्यापासूनच सुरुवात करण्यात आली होती. ही कामे पाच जून पूर्वी पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र संथ गतीमुळे कामे पूर्ण करण्यासाठी पंधरा जून पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ही कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासाकडून करण्यात आला आहे. नालेसफाईसह सर्व अनुषंगिक कामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाची कामे सुरू आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Anti-Corruption Bureau arrests bribe-taking Deputy Director of Agriculture Commissionerate
पुणे : कृषी आयुक्तालयातील लाचखोर उपसंचालकाला पकडले
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Aatkoli dumping ground Thane corporation FIR registered
ठाणे पालिकेच्या आतकोली कचराभुमीवर दगडांसह पाण्याची चोरी, पालिका प्रशासनाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Kalyan Dombivli Municipality on complaint of non collection of garbage
कल्याणमधील कचरा संकलनात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराचा ठेका रद्द, पालिकेकडून होणार ब, ड आणि जे प्रभागात सफाई
reconstruction of 40 thousand row houses in navi mumbai news in marathi
बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा; पार्किंगची अट शिथिल करण्याचा महापालिकेचा निर्णय
Air Quality Byculla , Air Quality Borivali,
बोरिवली व भायखळ्यातील निर्बंध उठले, ‘हे’ भाग निरीक्षणाखाली, वायू प्रदूषणासंदर्भात पालिका आयुक्तांनी दिला इशारा
Man robbed near Pune railway station
पुणे स्टेशन परिसरात नशेबाज चोरट्यांची दहशत; पैसे देण्यास नकार दिल्याने एकावर ब्लेडने वार
tanker driver arrested for supplying contaminated water to society in kharadi
खराडीतील सोसायटीत दूषित पाण्याचापुरवठा करणारा टँकर व्यावसायिक अटकेत, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याचा पुरवठा केल्याचे उघड

हेही वाचा >>>पावसाच्या अंदाजावर पाणी; राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला; २३ जूनपासून सक्रिय होण्याचा नवा अंदाज

शहरातील नाल्यांमध्ये पाणी तुंबण्याची ९५ ठिकाणे महापालिकेने निश्चित केली होती. या सर्व ९५ ठिकाणंची साफसफाई करण्यात आली असून सर्व ३८२ कल्व्हर्टची स्वच्छता करण्यात आली आहे. शहरातील १६५ किलोमीटर लांबीच्या नालांची स्वच्छता करण्यात आली असून नाल्यामधील गाळ काढण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले आहे.

शहरातील रस्त्यांवर पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी अस्तित्वातील चेंबर्सपैकी ४८ हजार चेंबर्समधील गाळ काढण्यात आला असून १८४ किलोमीटर लांबीच्या पावासाळी वाहिन्यांची साफसफाई करण्यात आली आहे. पदपथाच्या कडेने नवीन पावसाळी चेंबर्स तयार करून त्या पावसाळी वाहिन्यांना जोडण्यात आल्या आहेत. सातत्याने पाणी साचणारी ठिकाणे, कल्व्हर्ट, नालेसफाई आणि पावसाळी वाहिन्या आणि नलिकांची सर्व कामे पूर्ण झाली आहेत, असे प्रशासनाकडून स्प्ष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पुण्यात नोकरीसाठी आलेल्या २८ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न!; पत्राद्वारे मागितला न्याय

दरम्यान, पावसाळ्याच्या कालावधीतही साफसफाईची कामे सुरू राहणार आहेत. त्यासाठी महापालिका मुख्य भवनात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार असून ९६८९९३०५३१ आणि ९६८९९३५४६२ या व्हाॅटस्ॲप क्रमांकांवर नागरिकांना तक्रारी नोंदविता येणार आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाकडे रात्री येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी कनिष्ठ शाखा अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावरर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करून बिगारी सेवकांची रात्रपाळीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

Story img Loader