केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाचे (एनआरडीसी) लोकसंपर्क केंद्र (आउटरीच सेंटर) आघारकर संशोधन संस्थेत स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून एकस्व अधिकार, स्वामित्त्व हक्क, व्यापारचिन्ह दाखल करणे, नवउद्यमी, उत्पादन, उत्पादन संरक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण आदी कामे केली जाणार आहेत.

हेही वाचा >>>पुणे:कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थ जनजागृती कार्यक्रम; प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचा पक्षकारांशी संवाद

एनआरडीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अमित रस्तोगी यांनी ही माहिती दिली. संचालक शेखर मुंदडा या वेळी उपस्थित होते. आघारकर संशोधन संस्थेशी केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत लोकसंपर्क केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. दिल्ली येथील मुख्य कार्यालयासह विशाखापट्टणमनंतर पश्चिम भारतातील पुण्यात केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर ईशान्य भारतासाठी गुवाहाटीमध्ये केंद्र स्थापन करण्याचे नियोजन आहे. पुण्यातील केंद्राचे मंगळवारी (२० डिसेंबर) उद्घाटन करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: मेट्रो प्रकल्पाजवळील जागेत गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची सव्वाकोटींची फसवणूक

रस्तोगी म्हणाले की, विविध राष्ट्रीय संशोधन व विकास संस्था, विद्यापीठे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधून निर्माण होणा-या तंत्रज्ञानाचा विकास, प्रचार व हस्तांतरण करण्याचे कार्य एनआरडीसी करते. रसायने, कृषी आणि अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, जैवविज्ञान, यांत्रिकी, विद्युत आदी क्षेत्रातील विक्रीयोग्य औद्योगिक उत्पादने आणि सेवांमध्ये संशोधनासाठी प्रोत्साहन दिले जाते. गेल्या पाच वर्षांत दोन हजार तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यात आले. त्यामुळे सुमारे ४५०० कोटी रुपयांची भर देशाच्या अर्थव्यवस्थेत पडली आहे. करोना काळात व्यवसायावर परिणाम झाल्यानंतर उद्योगांचा प्रतिसाद वाढला आहे.

शैक्षणिक संस्था, उद्योगांचे पुणे हे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे पुण्यातील लोकसंपर्क केंद्राद्वारे नवउद्योजकांना, संशोधकांना, उद्योगांना, शैक्षणिक संस्थांना फायदेशीर ठरेल. आघारकर संशोधन संस्थेत लोकसंपर्क केंद्रासह इन्क्युबेशन सेंटरही सुरू केले जाणार असल्याचे मुंदडा यांनी नमूद केले.

Story img Loader