लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: मोठ्या जाहिरातफलकांसाठी उभारण्यात येणारे लोखंडी सांगाड्यांचे (होर्डिंग) स्थापत्य आरेखन केले जाणार आहे. तसेच या सांगाड्यांचा आकार आणि स्थिरतेसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आणि महापालिका अभियंता विभागाचा अभ्यास गट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी दिली.
सोमवारी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त सिंह यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की किवळेतील होर्डिंग दुर्घटनेतील मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले आहेत. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह मूळ गावी नेण्याची व्यवस्था महापालिकेने करून दिली आहे. मृतांच्या नातेवाइकांना महापालिका सर्व मदत करत आहे. जखमींवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर एका जखमीला उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. किवळेतील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेकडून शहरातील सर्वच जाहिरातफलकांसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सांगाड्यांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करणार आहे. या सांगाड्यांसाठी परवानगी देताना महापालिका नियमाप्रमाणे अभियंत्यांचे स्थापत्य विषयक प्रमाणपत्र पाहूनच परवानगी देत असते. मात्र, त्यानंतरही अशा घटना घडत असल्यामुळे शहरातील १४०७ अधिकृत होर्डिंगचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण करण्यात येईल.
मृतांच्या नातेवाइकांना शासनाकडून तीन लाखांची मदत जाहीर
किवळेतील घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती घेतली. मृतांच्या नातेवाइकांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी महापालिकेने मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला होता. या दुर्घटनेतील पाच मृतांच्या नातेवाइकांना तीन लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले आहे.