पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतच उर्से गावच्या हद्दीत शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण संगनमताने दडपण्यात आल्याची शक्यता दिसून येत आहे. दीड महिन्यानंतरही या संदर्भात कोणतीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मुंबईहून पुण्याकडे जाताना उर्से गावाच्या हद्दीत द्रुतगती मार्गाला खेटून असलेल्या जमिनीवरील मोठी झाडे कापून नेण्यात आली होती. २५ ते २८ जुलैदरम्यान घडलेला हा प्रकार स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींमुळे उघड झाला. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊनही शासकीय यंत्रणेला याबाबत काहीच माहिती कशी नव्हती, याचे तेव्हाही गूढ होते. प्रसारमाध्यमांनी हा विषय चव्हाट्यावर आणल्यानंतर बरीच खळबळ उडाली.

हेही वाचा >>> आता सर्व गोवंशाचे लसीकरण ; पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

त्यानंतर या प्रकरणी अज्ञात २५ जणांच्या विरोधात शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील दोषींवर कारवाई होईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात त्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही. ही वृक्षतोड कोणी केली, याचे सूतोवाच पर्यावरणप्रेमींनी केले होते. तरीही शासकीय यंत्रणेकडून काहीच कारवाई झाली नसल्याचे दिसून आले. या संदर्भात तपास सुरूच आहे, असे उत्तर पोलिसांकडून देण्यात येत आहे.

Story img Loader