करोना संकट काळात माणसे जगविणे महत्तवाचे होते. त्यासाठी निर्बंध लावण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही देशात टाळेबंदी केली होती. आता निर्बंध आणि बंधने हटविण्यात आली आहेत. ठाकरे सरकार असते तरी यंदाचा उत्सव निर्बंधमुक्त झाला असता, असे विधानसभेचे विरोधीपक्षनेता अजित पवार यांनी सांगितले.अजित पवार यांनी काही दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासह काही महत्वाच्या सार्वजनिक गणेश मंडळांना भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा >>> पुणे : आदित्य ठाकरे गणपती दर्शनासाठी पुण्यात

उद्धव ठाकरे यांचे सरकार असते तर यंदाचा गणेशोत्सव निर्बंध मुक्त झाला असता. आता उत्सव निर्बंधमुक्त होतो आहे याबाबात वेगळा अर्थ काढायची आवश्यकता नाही. त्यावेळी माणसे वाचविणे महत्वाचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निर्बंध आणि टाळेबंदी जाहीर केली होती, असे पवार म्हणाले.
प्रत्येकवेळी गणपतीचे दर्शन घेतले की काही तरी मागायलाच हवे का ? देवांना ही सारखे सारखे साकडे घालण्यात काही अर्थ नाही, असे उत्तर पवार यांनी गणपती बाप्पांकडे काय मागितले या प्रश्नाला दिले.

Story img Loader