लोकसत्ता वार्ताहर
शिरुर : कृत्रिम बुध्दीमत्ते मुळे सर्वच क्षेत्रात मोठे बदल होत आहे . कृत्रिम बुध्दीमत्तेचा वावर वाढत असला तरी शिक्षकांचे महत्व असणारच असल्याचे राज्य प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष तथा शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम म्हणाले . शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त विद्याधाम प्रशालेचा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा , महाविद्यालयीन नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रसिध्द उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारीवाल , शिरुर शिक्षण मंडळाचे चंदुलाल चोरडिया , मोहनलाल गादिया ,प्रकाश बोरा , शिरीष बरमेचा ,धरमचंद फुलफगर , शिरीष गादिया , राजेंद्र भटेवरा , राजेंद्र दुगड , कुमारपालजी बोरा , प्रकाश बाफना व संस्थेचे सचिव नंदकुमार निकम , प्राचार्य डॉ .के . सी . मोहिते , ॲड .सुभाष पवार ,प्रशासकिय आधिकारी देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते .
नंदकुमार निकम यावेळी म्हणाले की, शिरुर तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली . ६ फेबृवारी १९४६ या संस्थेची स्थापना झाली . १९४६ ला ७५ विद्यार्थी संख्या व ४ शिक्षक होते . आज संस्थेचा ११ शाखातून २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून ६९२ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहे.सन १९६७ ला संस्थेने महाविद्यालय सुरु केले . शिक्षण हे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून द्यावे लागते व शिक्षकांना लवचिक राहावे लागते .
कृत्रिम बुध्दीमत्ते मुळे सर्वच क्षेत्रात मोठे बदल होत आहे . कृत्रिम बुध्दीमत्तेचा वावर वाढत असला तरी शिक्षकांना महत्व असणार आहे . आगामी काळात शिक्षकांना आमृलाग बदल करावे लागणार असून नवीन तंत्रज्ञान स्वीकारुन नवीन बदल स्वीकारावे लागणार आहेत . संस्थेने दैंनदिन कामकाजात ई प्रशासन सुरु केले आहे .नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांना स्वंत :हाला सामावून घेता आले पाहिजे . शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ नेहमीच विविध क्षेत्रात अग्रगण्य राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
यावेळी प्रकाश धारीवाल म्हणाले की संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त ११ शाखेतील विद्यार्थी व शिक्षकांनी मिळवलेले यश , विविध स्पर्धा , क्रीडा स्पर्धा यासह विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाचा मागोवा घेवून या शाळांना व शिक्षकांना सन्मानित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे . शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाने शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा टिकवून ठेवला असून संस्थेच्या प्रगतीत आजी माजी विद्यार्थी शिक्षक व संस्थेचे विश्वस्त या सर्वांचे योगदान आहे .शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा म्हणाले की शिक्षणात गुणवत्ता महत्वाची आहे .आगामी काळात आमूलाग्र बदल होणार असून या बदलास सामोरे जाण्यासाठी शिक्षण महत्वाचे ठरणार आहे . प्रकाश बाफना यावेळी म्हणाले की पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची असते व शिरुर शिक्षण प्रसारक मंडळात उत्कृष्ट शिक्षकांची फळी आहे .
या प्रसंगी विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या गुणवंत शिक्षक व मुख्यध्यापकांचा, शाळांचा सन्मान करण्यात आला .यात प्राचार्य डॉ . के . सी . मोहिते , मुख्याध्यापक राजेंद्र थोरात , मुख्याध्यापक रामदास चव्हाण ,मुख्याध्यापिका ज्योती मुळे व मुख्याध्यापक डोके याचा समावेश होता . प्रास्ताविक मुख्याध्यापिका ज्योती मुळे यांनी केले . सूत्रसंचालन डॉ . क्रांती पैठणकर व दीपक गुजर यांनी केले . आभार डी .एस नाईक यांनी मानले .