लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आलेले आकाशवाणी पुणे केंद्राचे सायंकाळचे स्थानिक प्रसारण आता ७ एप्रिलपासून पूर्ववत सुरू होणार आहे.  आकाशवाणीच्या वरिष्ठ पातळीवरून नुकतीच यासाठी अनुमती प्राप्त झाली आहे. आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रसारण पूर्ववत सुरू करावे, यासाठी पुणेकर श्रोत्यांच्या लढ्याला यश आले आहे.

Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल

आकाशवाणीचे पुणे केंद्र १९५३ सालापासून कार्यरत आहे. प्रसार भारतीच्या अधिकृत आकडेवारीनुसार पुणे हे देशातील आकाशवाणीचे सर्वाधिक श्रोते असलेले शहर आहे. तसेच आकाशवाणीचे पुणे केंद्र हे आकाशवाणीचे जाहिरातींच्या माध्यमातून सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे केंद्र आहे. असे असूनही प्रसार भारतीच्या एका धोरणात्मक निर्णयामुळे दोन वर्षांपूर्वी पुण्यासह महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांची सायंकाळची प्रसारण निर्मिती बंद करून त्याऐवजी त्यांना मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करण्याचे आदेश देण्यात आले होते.

आणखी वाचा-पिंपरी : श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल; ‘असा’ आहे बदल

आकाशवाणीच्या स्थानिक कार्यक्रमांची निर्मिती कमी केल्यामुळे स्थानिक कलाकार, विचारवंत, तसेच आकाशवाणीचे नैमित्तिक उद्घोषक यांना मिळणाऱ्या संधी कमी झाल्या होत्या. त्या निर्णयाला आकाशवाणीच्या श्रोत्यांनी आणि स्थानिक कलाकारांनी विरोध केला होता. पुणे केंद्रातील अधिकाऱ्यांकडूनही स्थानिक श्रोते आणि कलाकारांच्या भावना वेळोवेळी वरिष्ठांना कळविल्या जात होत्या. अखेर या प्रयत्नांना यश मिळून ७ एप्रिलपासून आकाशवाणी पुणे केंद्राचे सायंकाळचे प्रसारण पूर्ववत करण्याच्या प्रस्तावाला वरिष्ठांनी अनुमती दिली. यामुळे आता पुण्यातील श्रोत्यांना त्यांच्या आवडीचे युववाणी, हॅलो आपली आवड, नभोनाट्य, लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, कौटुंबिक श्रुतिका इत्यादी  सायंकाळचे स्थानिक कार्यक्रम पुन्हा ऐकण्यास मिळणार आहेत.

आणखी वाचा- पुणे : शिंदे सरकारला उच्च न्यायालयाचा तडाखा

आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने सायंकाळचे स्थानिक प्रसारण सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला होता. त्यास अनुमती मिळाली असून त्यानुसार ७ एप्रिलपासून आकाशवाणी पुणे केंद्राचे सायंकाळचे स्थानिक प्रसारण आम्ही सुरू करणार आहोत. -इंद्रजित बागल, केंद्र संचालक आकाशवाणी आणि दूरदर्शन पुणे

Story img Loader