पिंपरी चिंचवड : मी पाणबुडीचा व्यवसाय करत नाही. पाणबुडीचा आणि माझ्या व्यवसायाचा संबंध नाही. मी पाणबुडी बनवतो का? असा प्रश्न उपस्थित करत अमोल कोल्हे हे पाणबुडीचे पुरावे देऊन दिशाभूल करत आहेत. ते सर्वांचं लक्ष विचलित करत आहेत. असं अमोल कोल्हे यांनी सादर केलेल्या पुराव्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले आहेत. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, आरोप आणि कोल्हे यांनी सादर केलेल्या पुराव्यांचा काही संबंध नाही. सॉफ्टवेअरविषयी आरोप केला होता. पाणबुडीचा माझ्या व्यवसायाशी काही संबंध नाही. अमोल कोल्हे यांनी सादर केलेले पुरावे हे पाणबुडीचे आहेत. ते सर्वांचं लक्ष विचलित करत आहेत. माझ्या व्यवसायाशी पाणबुडीचा काही संबंध नाही.
आणखी वाचा-पार्टी चोरली, चिन्ह चोरलं आणि आता सांगता सभेचं मैदानदेखील चोरलं : आमदार रोहित पवार
पुढे ते म्हणाले, संसदेत प्रश्न विचारल्यानंतर त्या- त्या खासदाराची चौकशी होते. हे अमोल कोल्हे यांना माहिती आहे की नाही? पुढे ते म्हणाले, आठ खासदारांनी प्रश्न विचारले आहेत. विनायक राऊत यांच्यासह इतर खासदार आहेत. पुराव्यांचा आणि माझ्या व्यवसायाचा काही संबंध नाही. त्यांना काही वाटलं असतं तर त्यांनी तक्रार करायला हवी होती. पाच वर्षे कोल्हे गप्प का बसले आहेत. निवडणूक हरल्याची लक्षणं आहेत. असा आरोप ही पाटील यांनी केला आहे.