पुणे : सासवडमधील तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ईव्हीएम यंत्र चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. इव्हीएम यंत्र चोरणाऱ्या चोरट्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले आहे. ग्रामीण पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> पुणे: कोंढव्यात अकराव्या मजल्यावरील सदनिकेत आग

up firing news, marathi news, bahraich violence
बहराइच हिंसाचार : गोपाल मिश्रा हत्या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांचा गोळीबार; नेपाळ सीमेवर झालेल्या चकमकीत दोघे जखमी
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
devendra fadnavis on women complaints
महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश
traffic police get abuse and threat in hiranandani meadows area in thane
पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धमकी
Auction vehicles of developer Andheri,
मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव
Five people including woman sub inspector who sacked in drug trafficker Lalit Patil case reinstated
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ केलेले पोलीस पुन्हा सेवेत
Action against cyber thieves by Central Crime Investigation Department Pune print news
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सायबर चोरट्यांविरुद्ध कारवाई; पुण्यासह देशभरात ३२ ठिकाणी छापे, २६ जणांना अटक
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ प्रकृती बिघडल्याने बॉम्बे रुग्णालयात, पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यातून करण्यात आलं एअरलिफ्ट

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. सासवड येथील तहसीलदार कार्यालयात ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आली आहेत. चोरट्यांनी तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. खोलीतील लोखंडी मांडणीवर ईव्हीएम यंत्रे ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी त्यापैकी डेमो ईव्हीएम यंत्र चोरून नेले. या घटनेची सासवड पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले. चित्रीकरणात तीन चोरटे आढळून आले आहेत. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.