येवलेवडी भागातील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगसेवक विष्णू हरिहर आणि साथीदारांवर स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन गुंडांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. विष्णू हरिहर, राहुल खुडे, प्रेम क्षीरसागर यांच्या सह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुडे आणि क्षीरसागर साराईत गुंड आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.