पुणे : नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सहा लाख एकवीस हजार निरक्षरांची नोंदणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार नोंदणी झालेल्या निरक्षरांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी (१७ मार्च) राज्यभरात घेण्यात येणार आहे.

योजना विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवभारत साक्षरता कार्यक्रम २०२२ ते २०२७ या कालावधीत राबवण्यात येत आहे. त्यात १५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या निरक्षरांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, जीवनकौशल्ये विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात लेखन, वाचन, संख्याज्ञानासह आर्थिक साक्षरता, कायदा आणि डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्यनिगा, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण अशा घटकांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गटस्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत उल्लास उपयोजनावर निरक्षरांची नोंदणी केलेली प्रत्येक शाळा केंद्र आहे. या केंद्रावर रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत पायाभूत चाचणी घेतली जाणार आहे.

11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
three day book Exhibition held on occasion of Granthali Readers Day attracting over 3000 visitors from Thane
चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
school students ai education
नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
vivek oberoi reveals why he rejected om shanti om film
विवेक ओबेरॉयचा १७ वर्षांनी खुलासा; शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ सिनेमा का नाकारला? म्हणाला, ” तेव्हा ४ ते ५ महिने…”

हेही वाचा – भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू झालेले नाराजीनाट्य चार दिवसांत संपेल, गिरीश महाजन यांचा दावा

वाचन, लेखन आणि संख्याज्ञान अशा तीन भागांसाठी प्रत्येकी ५० या प्रमाणे १५० गुणांची पायाभूत चाचणी होणार आहे. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागात किमान ३३ गुण आवश्यक आहेत. प्रत्येक भागाची चाचणी तीन तासांची आहे. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकत्रित असेल. परीक्षा मराठी माध्यमातून होणार आहे. माध्यमांचे परीक्षार्थी असल्यास त्याबाबतची व्यवस्था जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडून केली जाईल. उत्तीर्णांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे योजना उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

हेही वाचा – अजित पवारांचे बंधू सुप्रिया सुळेंच्या प्रचारात, श्रीनिवास पवार यांच्याकडे इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी

परीक्षेच्या कामात कुचराई केल्यास कारवाई

अशैक्षणिक कामाच्या विरोधाच्या अनुषंगाने शिक्षक संघटनांनी नवभारत साक्षरता अभियानाला विरोध केल्यामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता ६ लाख २१ हजार निरक्षरांची नोंदणी झाली आहे. परीक्षा कामकाजात अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना योजना संचालनालयाने केंद्रसंचालकांना दिल्या आहेत. तसेच परीक्षा कामकाजात कुचराई करणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे.

Story img Loader