महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका देण्याची सुविधा यंदाच्या परीक्षेपासून रद्द करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावी-बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळ आणि विभागीय मंडळांतर्फे उपाययोजना करण्यात येतात. यंदा राज्य मंडळाने अभिनव प्रयोग करत लोकसहभागातून गैरप्रकार रोखण्यासाठीचा कृति आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पालक, शिक्षक आदी घटकांकडून सूचनाही मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्य मंडळाकडे २३८ सूचना प्राप्त झाल्या. त्यानंतर आता राज्य मंडळाने परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका देण्याची सुविधा यंदाच्या परीक्षेपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा >>> पुणे: एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
दहावी-बारावीच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे नीट आकलन होण्यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत गेली काही वर्षे वापरण्यात येत होती. मात्र परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांमध्ये येण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. तसेच पेपरफुटीच्याही चर्चा होतात. दहावी-बारावीच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण टप्पा असल्याने पालक आणि समाज घटकांचे या परीक्षांकडे लक्ष असते. पेपरफुटीच्या अफवांमुळे राज्य मंडळाची समाजातील प्रतिमा मलीन होते. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी, निकोप आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका देण्याची सुविधा यंदाच्या परीक्षेपासून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात अकरा वाजता, तर दुपारच्या सत्रात तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकेचे वाटप सुरू होणार असल्याचे ओक यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा >>> चालत्या मोटारसायकलवर दहा सूर्यनमस्कार; बारामतीच्या रोहित शिंदे याची इंडिया, एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद
परीक्षा दालनात ज्या क्रमाने प्रश्नपत्रिकेचे वाटप होईल, त्याच क्रमाने परीक्षेचा कालावधी संपल्यावर लिखित उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांकडून गोळा करण्याच्या सूचना सर्व दालन पर्यवेक्षकांना परिरक्षक आणि केंद्रसंचालकांमार्फत देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास उपस्थिती आवश्यक
राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना या पूर्वीच दिल्या आहेत. त्या बाबत प्रवेशपत्रावरही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.