महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या गेल्या वर्षीच्या अनेक परीक्षांची मागणीपत्र न आल्यामुळे परीक्षा खोळंबलेल्या असताना आयोगाकडून पुढील वर्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. पुढील वर्षी १० एप्रिलला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे.
आयोगाच्या गेल्या दोन वर्षांच्या जवळपास ९ परीक्षा अद्यापही खोळंबलेल्या आहेत. मात्र, आयोगाकडून पुढील वर्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुढील वर्षीची राज्यसेवा पूर्व परीक्षा १० एप्रिलला, तर मुख्य परीक्षा २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत घेण्याचे प्रस्तावित आहे. परीक्षेची जाहिरात डिसेंबरमध्ये प्रसिद्ध होणार आहे. वनसेवा पूर्व परीक्षा ३ एप्रिलला आणि मुख्य परीक्षा १४ ऑगस्टला होणार आहे. पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा २८ ऑगस्टला आणि मुख्य परीक्षा ११ डिसेंबरला प्रस्तावित आहे. यांसह करसहायक, विक्रीकर निरीक्षक, विद्युत अभियांत्रिकी, दिवाणी न्यायाधीश अशा विविध १६ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या ६६६.ेस्र्२ू.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावर हे वेळापत्रक उपलब्ध आहे.

Story img Loader