पुणे : शहर आणि परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी आणि नाल्यांना पूरदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीला आलेल्या पुरामुळे नाल्यातील पाण्याला फुगवटा येण्याची शक्यता आहे. त्यातच पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने यंत्रणा सतर्क झाल्या असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. विशेषत: नदी आणि नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांनी सावधनता बाळगावी, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, अशी सूचना महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून पुढील तीन दिवसात शहर आणि परिसरात अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा