लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बेकायदा गावठी दारु वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागातील (स्टेट एक्साईज) दुय्यम निरीक्षकालाच्या दुचाकीला मोटारीची धडक देण्यात आली. कारवाई केलेला टेम्पो घेऊन आरोपी पसार झाल्याची घटना नगर रस्त्यावरील भावडी गावात घडली. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Anand Dave on Saif Ali khan
“तैमुर नावामुळे सैफवर हल्ला झाला असता तर आम्हाला…”, जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना आनंद दवे यांचं विधान
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sandalwood thief arrested on Sinhagad road
सिंहगड रस्त्यावर चंदन चोरी करणारा गजाआड
Two youths die in separate accidents in Pune city
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
women strangled to death with blanket due to suspicion of character in Narhe
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून, नऱ्हे भागातील घटना
Sandeep Kshirsagar On Walmik Karad
Sandeep Kshirsagar : “वाल्मिक कराडपर्यंत तपास आला की तपास थांबतो, कारण…”, संदीप क्षीरसागर यांचा खळबळजनक आरोप
Anjali Damania
Anjali Damania : “धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या”, अंजली दमानियांनी जोडला आणखी एक पुरावा; म्हणाल्या…
Yuvraj Mahadev Vavhal of Kandli village who was preparing for a competitive exam died in a Narayan accident Pune news
युवराजचे अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; नारायणगावातील अपघातानंतर पंचक्रोशीत शोककळा

याबाबत उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक विशाल कदम (वय ३०) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक विशाल कदम नगर रस्ता भागातील भावडी गावात कारवाईसाठी गेले होते. त्या वेळी टेम्पोतून गावठी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

आणखी वाचा-थिरकणाऱ्या व्हीलचेअर्स, रसिकांच्या टाळ्यांचा निनाद आणि…

भावडी गावातील रस्त्यावर त्यांनी टेम्पो अडविला. पाठीमागून येणाऱ्या एका मोटारीने दुचाकीस्वार कदम यांना धडक दिली. दुचाकीस्वार कदम रस्त्यात पडले. कारवाई केलेला टेम्पो घेऊन चालक पसार झाला. अंधारात मोटारचालकही पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार तपास करत आहेत.

Story img Loader