दिवाळीनिमित्त यंदाही येरवडा कारागृहातील कैद्यांनी (बंदी) घडविलेल्या विविध गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयाेजन करण्यात आले आहे. कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा- मुसळधारांच्या तडाख्यात ; राज्यातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू ; कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कायम

Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Bogie - Vogie Restaurant, Restaurant at Akurdi Railway Station, Pimpri , Akurdi ,
पिंपरी : आकुर्डी रेल्वे स्थानक येथे ‘बोगी – वोगी’ रेस्टॉरंट
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच

येरवडा मध्यवर्ती कारागृह देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे कारागृह आहे. या कारागृहात विविध गुन्ह्यात शिक्षा झालेले कैदी शिक्षा भोगत असून शिक्षा कालावधीत कैद्यांना कारागृहात वेळ व्यतीत करायचा असतो. कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून त्यांना विविध कलात्मक वस्तू घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. कारागृहात सुतारकाम, शिवणकाम, बागकाम, बेकरी उत्पादने तसेच विविध वस्तू घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी दिवाळी, राखी पौर्णिमा, नाताळ, गणेशोत्सवात कैद्यांनी घडविलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आयोजित केले जाते. दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील शास्त्रज्ञ प्रदीप एम. कुरलकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डाॅ. भारती कुरलकर, कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) स्वाती साठे, उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ (मुख्यालय), दौलतराव जाधव तुरंग अधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रमणी इंदूरकर, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शिवशंकर पाटील, उर्मिला पाटणकर, सुषमा कोंडे-देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा- विश्लेषण : उद्धव ठाकरेंसाठी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आव्हानात्मक कशी ठरणार?

कारागृहात विविध शासकीय कार्यालयांना लागणारी लोखंडी कपाटे, फर्निचर, गणवेश, सतरंजी, फाईल, बेडशीट, टाॅवेल आदी वस्तू तयार केल्या जातात. या वस्तुंचा दर्जा चांगला असल्याने नागरिकांकडून मोठी मागणी असते. विमानतळ रस्त्यावरील येरवडा कारागृहाच्या उद्योग विक्री केंद्रात सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली.

Story img Loader