पुणे : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महामेट्रोने नवीन वर्षात पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. यामुळे पिंपरी- चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या गरवारे स्थानक ते रुबी हॉल स्थानक आणि फुगेवाडी स्थानक ते जिल्हा न्यायालय स्थानक या मार्गाचे लोकार्पण होऊन या मार्गावर प्रवासी सेवेचा विस्तार झाला. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिका १ (पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते जिल्हा न्यायालय) आणि मार्गिका २ (वनाझ ते रुबी हॉल) मिळून एकूण २४ किमी मार्गावर प्रवासी सेवा सुरु झाली आहे. उर्वरित ९ किमी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असून लवकरच पुणे मेट्रोची पहिल्या टप्प्यातील संपूर्ण मार्गिका प्रवाश्यांसाठी खुली करण्यात येणार आहे.

pune traffic jam issue
वाहतुकीचे तीनतेरा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
MHADA offices are now on lease Mumbai news
म्हाडाची आता भाडेतत्त्वावरील कार्यालये
Traffic changes due to flyover work at Savitribai Phule Pune University Chowk Pune news
पुणे: विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
capacity of 200 e-bus charging stations in the ST fleet will also increase in one year
एसटीच्या ताफ्यात वर्षभरात २०० ई-बस चार्जिंग स्टेशनची क्षमताही वाढणार
Traffic changes in Yerwada area on the occasion of Army Day procession
सेना दिन संचलनानिमित्त येरवडा भागात वाहतूक बदल

हेही वाचा – “अजितदादांचा एवढा दरारा आहे तर त्यांनी…”, अमोल कोल्हेंचं अजित पवारांना आव्हान

लोकांमधील पुणे मेट्रोचा प्रवासासाठी होणारा वाढता वापर आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणे मेट्रो प्रवासी सेवेचा विस्तार करीत आहे. पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरु असते. यामध्ये सकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत मेट्रोच्या दर १५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर ९ फेऱ्या, सकाळी ८ ते ११ दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ वर १७ तर मार्गिका २ वर १८ फेऱ्या, सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत दर १५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर २० फेऱ्या, दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर २५ फेऱ्या आणि रात्री ८ ते रात्री १० या वेळेत दर १५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ वर १० व मार्गिका २ वर ८ फेऱ्या होत होत्या.

आता प्रवाशांची वाढती संख्या आणि प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणे मेट्रो प्रवासी सेवेचा विस्तार करीत आहे. १ जानेवारी २०२४ पासून मेट्रो दोन्ही मार्गिकांवर सकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत मेट्रो दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर १२ फेऱ्या, सकाळी ८ ते ११ दर ७.५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर २४ फेऱ्या, सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ वर ३२ व मार्गिका २ वर ३० फेऱ्या, दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत दर ७.५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर ३२ फेऱ्या आणि रात्री ८ ते रात्री १० या वेळेत दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर १३ फेऱ्या प्रत्येक स्थानकावरून उपलब्ध होणार आहे.

यामुळे प्रवाश्यांच्या प्रतिक्षेचा कालावधी कमी होऊन त्यांच्या वेळेची बचत होईल. त्याचबरोबर मेट्रोची दिवसांमधील वारंवारता वाढणार आहे. या आधी दिवसभरात मार्गिका १ वर ८१ फेऱ्या होत होत्या, तर १ जानेवारी २०२४ पासून ११३ फेऱ्या होणार आहेत आणि मार्गिका २ वर ८० फेऱ्या होत होत्या, तर १ जानेवारी २०२४ पासून १११ फेऱ्या होणार आहेत.

हेही वाचा – पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय; येरवड्यात तीस ते पस्तीस वाहनांची तोडफोड

दोन्ही मार्गिकांवर आठ गाड्या धावणार

गर्दीच्या वेळात मार्गिका १ व २ वर ६ मेट्रो ट्रेन कार्यान्वित आहेत, तर १ जानेवारी २०२४ पासून मार्गिका १ व २ वर ८ मेट्रो ट्रेन कार्यान्वित होणार आहेत. तसेच कमी गर्दीच्या वेळात मार्गिका १ व २ वर ४ मेट्रो ट्रेन सध्या कार्यान्वित आहेत. १ जानेवारी २०२४ पासून कमी गर्दीच्या वेळेत मार्गिका १ व २ वर ६ मेट्रो ट्रेन कार्यान्वित होणार आहेत.

१ जानेवारी २०२४ पासून होणाऱ्या प्रवासी सेवेच्या विस्तारामुळे मेट्रोच्या प्रवासी वेळेत जास्तीत जास्त लोकांना प्रवास करणे शक्य होणार आहे व वेळेचीदेखील बचत होणार आहे. सकाळी व संध्याकाळी ऑफिस जाण्याच्या/येण्याच्या वेळेत होणारी गर्दी कमी होईल. – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

Story img Loader