चिन्मय पाटणकर chinmay.reporter@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेतर्फे २१ ते २५ डिसेंबर दरम्यान रंग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आशयसंपन्न हिंदी, इंग्रजी नाटकं या महोत्सवात पुणेकरांना पाहायला मिळतील.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर या नाटय़संस्थेने केवळ नाटय़निर्मिती किंवा नव्या पिढीतून नवे रंगकर्मी घडवण्यासाठी कार्यशाळा न करता प्रेक्षकांनाही एकप्रकारे रंगभान यावं यासाठी प्रयत्न केले आणि ते आजही सुरू आहेत. २१ ते २५ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेला रंगमहोत्सव त्याचाच एक भाग.. पुण्यातील नाटय़प्रेमींना भारतातील इतर प्रांतांमध्ये काय पद्धतीचं नाटक होत आहे, काय प्रयोग केले जात आहेत, हे पाहण्याची संधी रंगमहोत्सवच्या माध्यमातून अनुभवायला मिळेल. ज्योत्स्ना भोळे सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात सात नाटय़प्रयोग सादर होतील.
ज्येष्ठ रंगकर्मी संजना कपूर यांच्या हस्ते २१ डिसेंबरला महोत्सवाचं उद्घाटन होईल. त्यानंतर रसिका आगाशे दिग्दर्शित ‘सत भाषे रैदास’ या नाटकाने महोत्सवाची नांदी होईल. १५ व्या शतकातील संत रविदास यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा हा सांगीतिक—नाटय़प्रयोग महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रसिकांना पाहता येणार आहे. या नाटकाची निर्मिती मुंबईच्या बिईंग असोसिएशन या संस्थेची आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चेन्नईची थिएटर निशा ही संस्था सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक असगर वजाहत यांच्या कथा नाटय़रुपात सादर करणार आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध नाटय़ दिग्दर्शक व्ही. बालाकृष्णन यांनी ‘असगर’ या नाटकाचं दिग्दर्शन केले असून वजाहत यांच्या दहा आशयसंपन्न कथा या प्रयोगातून अनुभवता येतील.
तिसऱ्या दिवशी दिल्ली येथील मिट पपेट कंपनी ही संस्था ‘कल्पना और उसकी (दोस्त) योनिका’ आणि ‘व्होल सम पार्ट्स’ हे दोन नाटय़प्रयोग सादर करणार आहे. ‘कल्पना और उसकी (दोस्त) योनिका’ हा नर्मविनोदी नाटय़प्रयोग जगप्रसिद्ध चित्रकार राजा रवीवर्मा यांच्या चित्रांवरून प्रेरित आहे. तर, ‘व्होल सम पार्ट्स’ हा नाटय़प्रयोग २१व्या शतकातील स्त्रियांच्या जगण्यावर, जाहिरातींमुळे स्त्रियांकडम्े बघितल्या जाणाऱ्या वेगळ्या दृष्टिकोनावर खुमासदार पद्धतीने भाष्य करतो.
महोत्सवाच्या चौथ्या दिवशी मुंबईच्या प्लेट्रिक्स या संस्थेचे शिव सुब्रम्हण्यम लिखित आणि दिव्या जगदाळे दिग्दर्शित ‘टॉक्सिक’ आणि ‘द वे आय सी ईट’ हे दोन नाटय़प्रयोग सादर होतील. आजच्या धकाधकीच्या जीवनातील पती—पत्नीचे तणावपूर्ण नातेसंबंध आणि त्यातून निर्माण होणारा गुंता याचे चित्रण ‘टॉक्सिक’मध्ये आहे. तर, ‘द वे आय सी ईट’ या एकल नाटय़प्रयोगात चाळिशीतल्या स्त्रीच्या जगाकडे-घराकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर हलक्याफु लक्या पद्धतीनं भाष्य करण्यात आलं आहे.
हिंदी-बुंदेलखंडी भाषेतील ‘झलकारी’ या सांगीतिक नाटय़प्रयोगाने महोत्सवाचा समारोप होईल. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्त्री-सैनिक दलाची प्रमुख झलकारी बाई यांच्या जीवनावर आधारित हे नाटक आहे. १८५७ च्या संग्रामात झलकारीबाई यांनी दिलेलं महत्त्वपूर्ण योगदान या नाटकातून अधोरेखित करण्यात आलं आहे. अतिशय वेगळ्या धाटणीच्या या नाटय़प्रयोगांनी रंगणारम्या या महोत्सवातील नाटकांसाठी प्रवेशमूल्य आहे.