पुणे: जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्ये प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह एकूण सात जनांवर हत्येच्या कटात सहभागी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. किशोर आवारे यांच्यासोबत राजकारणामध्ये एकत्रितपणे काम केलं. आमचे विचाराच्या माध्यमातून मतभेद असतील पण मनभेद नव्हते. परंतु, काही मंडळी यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अस कोणी करत असेल तर ते कोणी करू नये. या घटनेला राजकीय वळण देऊ नका असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. पोलिस यंत्रणेला मी पूर्ण सहकार्य करत आहे. अस ते म्हणाले आहेत.

किशोर आवारे यांची शुक्रवारी दुपारी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. यानंतर या घटनेला वेगळे वळण मिळत आहे. आमदार सुनील शेळकेसह सात जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपावर आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी हे आरोप फेटाळले आहे. ज्या व्यक्तीचा या हत्येच्या पाठीमागे हात आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी.

Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणी ग्रामस्थांचा सरकारला अल्टिमेटम; म्हणाले, “उद्या सकाळी १० वाजेपर्यंत…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
Dhananjay Deshmukh News
Dhananjay Deshmukh : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिलाय..”, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख काय म्हणाले?
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Santosh Deshmukh : “संतोष देशमुखांच्या हत्येला महिना उलटूनही आरोपी पकडले जात नसतील तर..”, वैभवी देशमुखची आर्त हाक
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत?” संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल

आणखी वाचा-तळेगावातील किशोर आवारे खूनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा; राजकीय क्षेत्रात खळबळ

आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘काल दुपारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची नगरपालिकेच्या आवारामध्ये दुपारी हत्या करण्यात आली. या हत्येचा, घटनेचा जाहीर तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो. कालची घटना झाली त्या घटनेनंतर आज सकाळी सात वाजता सुनील शेळके नोटरीचेबल, फोन स्विच ऑफ अशा पद्धतीने माध्यमाने ज्या काही बातम्या लावण्याचे काम केलं त्या अनुषंगाने आत्ता मी पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहे. कालची जी काही घटना झाली या घटनेमध्ये कोण आरोपी आहेत. ही घटना का? केली यामागची सत्यता काय? आहे. त्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय आहे? ते कोण गुन्हेगार आहेत याची सखोल चौकशी पोलीस खात्यातील सर्व अधिकारी प्रामाणिकपणे करण्याचं काम करत आहेत. परंतु, जी काही घटना घडली या मावळ तालुक्याला वेगळा पायंडा पाडण्याचं काम राजकारणाच्या माध्यमातून किंवा समाजकारणाच्या माध्यमातून कुणी करू नये याच करता आम्ही सातत्याने देखील एक समान जास्त पणाची भूमिका घेऊन काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहेत.”

ते पुढे म्हणाले, “मागील काही दिवसापूर्वी किशोर आवारे असतील किंवा आम्ही असू राजकारणामध्ये एकत्रितपणे काम केलं. परंतु, आमचे विचार मतभेद असतील परंतु मनभेत नव्हते. काही मंडळी यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर कृपया करून अशा घटनेला राजकीय वळण देऊ नका. घटनेची सत्यता समाजापुढे न्याय देवता आणि पोलीस यंत्रणा आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कालच्या घटनेमध्ये संध्याकाळी जी काय नोंद करण्यात आली त्यामध्ये माझं स्वतः सुनील शेळके माझा भाऊ सुधाकर शेळके संदीप गराडे आणि इतर काही अशा व्यक्तींकडून हत्येचा कट करण्यात आला त्यामध्ये सांगण्यात आलं. परंतु, ही फिर्याद देत असताना शेवटी एखाद्या कुटुंबातला व्यक्ती गेल्यावरती त्या परिवाराची भावना देखील तीव्र असते हे आम्ही समजू शकतो. परंतु, त्या मागचे खरे कोण सूत्रधार आहेत कोण हे सगळं घडवत हे कोण जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करतो हे देखील आम्ही पुढील काळामध्ये शोध घेऊन तो नक्कीच जनतेपुढे आणल्याशिवाय राहणार नाही.”

आणखी वाचा- पुणे: भोजपुरी फिल्ममधील अभिनेत्रीला जाळ्यात ओढून सेक्स रॅकेट; दलालास केली पोलिसांनी अटक

“मला एवढे सांगायचे की माझ्या मायबाप जनतेने या सुनील शेळकेला आयत्या वेळेला पक्षांमध्ये दुसऱ्या येऊन सुद्धा ९४ हजार मताने निवडून दिले. ते कुणाच्या जीवावर उठायला कुणाला लुटमार करायला कुणाला फसवायला निवडून दिले नाही. राजकारण करत असताना आपण विकासाचा राजकारण केले पाहिजे आपण आरोप प्रत्यारोप करत असतो तरी ते तात्पुरते असले पाहिजेत. राजकारणापासून अलिप्त व्हायचं असेल तर आज होईल परंतु बदनाम करून जर कोणी मला अलिप्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मी कदापी सहन करणार नाही चौकशी सखोल करा याच्यातून कोण गुन्हेगार आहेत यांची देखील चौकशी करा आणि यामागे कोण राजकारण करतोय यांची देखील आपण चौकशी केली पाहिजे. सामाजिक जीवनामध्ये व्यावसायिक जीवनामध्ये काम केलं. माझ्या राजकीय जीवनात कधी साधी कोणाच्या तोंडात थप्पड (चापट) मारली किंवा कुणाला शिवी दिली नाही.” असेही ते म्हणाले

Story img Loader