महापालिका फेरीवाला समिती निवडणुकीसाठी २८ लाखांचा खर्च अपेक्षित असून हा निधी वर्गीकरणाद्वारे अंदाजपत्रकात योजना, प्रकल्पांसाठी राखीव असलेल्या निधीतून देण्यात यावा, असा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: नवले पूल ते कात्रज बोगदा रस्त्याच्या बांधणीतच चुका; राज्य वाहतूकदार महासंघाचा आरोप
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून निवडणुकीसाठी २२ हजार ८८९ विक्रेत्यांची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. समिती निवडणुकीसाठी अर्थशीर्षक नसल्याने वर्गीकरण करून निवडणूक खर्च करता येणे शक्य आहे. निवडणुकीसाठी ३९ लाख ९४ हजार खर्च अपेक्षित आहे. मात्र आयुक्तांनी २८ लाखांचा खर्च करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार २८ लाखांचा निधी मिळावा, यासाठी हा प्रस्ताव अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून स्थायी समितीला देण्यात आला आहे.