पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात रविवारी रात्री दरड कोसळली. दरड कोसळ्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. वाहतूक ठप्प झाल्याने कोंडी झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
दरड कोसळल्याची माहिती मिळताच आयआरबी, देवदूत यंत्रणा, तसेच महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घाटात पडलेली दरड काढण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. दरड काढण्यासाठी जेसीबी यंत्र, डंपर मागविण्यात आले आहेत. दरड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. दरम्यान, वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या तीन मार्गिकेवरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन वळविण्यात आली आहे.
First published on: 24-07-2023 at 00:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expressway landslide in khandala ghat traffic jam on the expressway pune print news rbk 25 ysh