पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) ५ मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना १६ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एजन्सी) वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी ९ फेब्रुवारी ९ मार्च अशी मुदत देण्यात आली होती. मात्र अद्यापही काही विद्यार्थी अर्ज भरू शकले नाहीत, काहींचे अर्ज अपुरे असल्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्यानंतर एनटीएने मुदतवाढ देत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
हेही वाचा – अजित पवार यांचा सूचक इशारा; म्हणाले, “दोन्ही दादांनी नगरसेवक निवडून आणले, हे विसरू नका…”
हेही वाचा – मावळमध्ये महाविकास आघाडीचे ठरले, महायुतीत अद्यापही अनिश्चितता
देशस्तरावरील होणारी नीट ही प्रवेश परीक्षा ५ मे रोजी होणार असून, त्याचा निकाल १४ जूनला जाहीर होणार आहे. मराठीसह एकूण १३ भाषांमध्ये ही परीक्षा देता येते. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, शुल्क याबाबतची सविस्तर माहिती एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.