पुणे : महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेची कामे अद्यापही पूर्ण न झाल्याने योजनेला मुदतवाढ दिली जाणार आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाला असून, जूनअखेरपर्यंत ही कामे करण्यात येणार आहेत. शहराच्या सर्व भागाला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी, तसेच वितरणातील गळती आणि त्रुटी दूर करण्यासाठी अडीच हजार कोटींची ही योजना महापालिकेने हाती घेतली आहे. या योजनेला सन २०१५ मध्ये मंजुरी देण्यात आली. मात्र, सल्लागार नियुक्त करणे, योजनेचा सविस्तर प्रकल्प आराखडा करणे अशा कामांमुळे योजनेचे प्रत्यक्षातील काम २०१८ मध्ये सुरू झाले. त्यानंतर पुढील पाच वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

योजनेचे काम सुरू झाल्यानंतर करोना संसर्गाचा फटका योजनेला बसला. त्यामुळे एप्रिल २०२३ ऐवजी नोव्हेंबर २०२३ पर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत ८० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांची कामे करण्यात आली. मात्र अद्यापही काही कामे राहिली असल्याने मुदतवाढीचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने आयुक्त कार्यालयाला दिला आहे.

हेही वाचा…पुण्यात घरांची विक्री जोरात! जाणून घ्या कोणत्या घरांना पुणेकरांची मिळतेय पसंती

या योजनेंतर्गत एक हजार ८०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकणे, जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्यांची दुरुस्ती करणे, साठवणूक टाक्यांची उभारणी करण्याबरोबरच निवासी आणि व्यावसायिक मिळकतींना जलमापक बसविणे अशा तीन समांतर टप्प्यांत योजनेची कामे सुरू करण्यात आली आहेत.