पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या तीस नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी वेळ लागत असल्याने महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी हा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीएमआरडीएकडून १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांसाठी लाॅटरी काढण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील (ईडब्ल्यूएस) ४७ सदनिका, कमी उत्पन्न गट (एलआयजी) प्रवर्गासाठी ६१४ सदनिका आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेंतर्गत ३४७ सदनिका आणि एलआयजी प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ सदनिका उपलब्ध आहेत. यासाठी अर्ज करण्यासाठी १२ नोव्हेंबर पर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे मिळविण्यास नागरिकांना अडचणी येत होत्या. तसेच कागदपत्रे अपलोड करण्यासही वेळ लागत होता. त्यामुळे लाॅटरी योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अनेकांनी पीएमआरडीएकडे केली होती. त्यानुसार महानगर आयुक्त डाॅ योगेश म्हसे यांनी ही मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढविली आहे.

हेही वाचा >>>सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे

सदनिकेसाठी ३० नोव्हेबरला मुदत संपल्यानंतर १७ डिसेंबरला सोडतीसाठी अर्जाची स्वीकृत प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून १८ डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. त्यानंतर २७ डिसेंबरला सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करत ३१ डिसेंबरला अंतिम सोडत काढण्यात येणार आहे. पीएमआरडीच्या संकेतस्थळावर सोडतीमधील पात्र लाभार्थी आणि प्रतिक्षा यादीतील अर्जदारांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extension of the sadanika lottery scheme of pmrda pune print news apk 13 amy