महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत, तर दहावीच्या विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>वसंत मोरे : जनतेच्या मनातील नेता

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीत शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत ५ नोव्हेंबर तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून भरायची मुदत १० नोव्हेंबरला संपणार आहे.

हेही वाचा >>>मटण खवय्यांमुळे प्रजननासाठी बोकड मिळेना ; सीमावर्ती जिल्ह्यांतून दक्षिण भारतात शेळय़ा-बोकडांची विक्री वाढली

दहावीची परीक्षा देणाऱ्या पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी २५ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. तर, माध्यमिक शाळांना चलनाद्वारे बँकेत शुल्क भरण्यासाठी २९ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर प्री-लिस्ट चलनासोबत विभागीय मंडळात जमा करण्यासाठी १ डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. बारावीसाठी नियमित शुल्कासह १५ नोव्हेंबरपर्यंत आणि विलंब शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तसेच उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनाद्वारे बँकेत शुल्क भरण्यासाठी २ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extension of time for filling application form for class 10th 12th examination pune print news amy
Show comments