पिंपरी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी, पिंपरीत राबविण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पासाठी अर्ज करण्यास १२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची माहिती सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली. या प्रकल्पासाठी अर्ज भरण्याची २८ जुलैपर्यंत मुदत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांपैकी अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला ही कागदपत्रे मिळण्यास नागरिकांना विलंब होत आहे. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यासाठी १२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी आकुर्डी (मोहननगर) व पिंपरी (उद्यमनगर) येथील गृहप्रकल्पात ९३८ सदनिका आहेत. त्यासाठी दहा हजारहून अधिक नागरिकांनी अर्ज केले आहेत. नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.