पुणे : कोथरूड येथे उभारण्यात येत असलेल्या शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे बाह्य बांधकाम पूर्ण झाले आहे. याच्या उर्वरित कामासाठी २३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविला आहे.

प्रसिद्ध कवी गीतकार गदिमा यांचे स्मारक उभारण्याचा विषय ४० वर्षांहून अधिक काळ रखडला होता. माडगूळकर कुटुंबीयांनी महापालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर कोथरूड येथील महात्मा सोसायटीजवळील सर्व्हे नंबर ६९-७० ही जागा स्मारकासाठी निश्चित करण्यात आली आहे. या भागातील ६.२७ एकर जागेवर या स्मारकासह कोथरूड प्रदर्शन केंद्र उभारण्यात येत आहे, तर गदिमा स्मारकाचे बांधकाम एकूण ९ हजार ३९३.३२ चौरस मीटरचे आहे. या स्मारकाचे बाह्य बांधकाम पूर्ण झाले असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. याच्या उर्वरित कामासाठी राज्य सरकारने २३ कोटी रुपयांचा निधी द्यावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आयुक्त भोसले यांनी दिली.

Hospital for animals set up by Mumbai Municipal Corporation in collaboration with Tata Trust Mumbai news
प्राण्यांसाठीच्या रुग्णालयाचे स्वप्न पूर्ण, पण उद्घाटन राहिले…; मुंबई महापालिकेने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उभारले रुग्णालय
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
BJP Navi Mumbai, Navi Mumbai Eknath Shinde,
नवी मुंबईत शिंदे समर्थकांच्या अभियानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता
cabinet nod to acquire 256 acres of salt pan land for Dharavi housing scheme
मिठागरांच्या जागेवर धारावी प्रकल्पग्रस्त; २५६ एकर जमिनीवर पुनर्वसनासाठी इमारती बांधण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
Dhammachakra initiation ceremony
अखेर दीक्षाभूमीवर खोदलेले खड्डे बुजवले, धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यासाठी दीक्षाभूमी सज्ज
road affected, beneficiaries, Kalyan,
कल्याणमधील १६५ रस्ते बाधितांमधील पाच लाभार्थींना मिळाली २४ वर्षांनी घरे
Martyrs memorials erected in their native villages These monuments are dilapidated and need to be reconstructed
चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्मारकांची दुरवस्था बांधकाम विभाग, पंचायत समितीचे दुर्लक्ष
Rajkot Fort, statue Chhatrapati Shivaji Maharaj Rajkot Fort, Chhatrapati Shivaji Maharaj,
राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा नव्याने पुतळा उभारण्याची प्रक्रिया सुरू, निविदा प्रसिद्ध

हे ही वाचा…दहावी बारावी शिष्यवृत्तीसाठी महापालिकेकडे आले ‘ इतके ‘ अर्ज

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड भागात साकारण्यात येत असलेल्या गदिमा स्मारकाची गेल्या आठवड्यात पाहणी केली होती. पालिका आयुक्त राजेंद्र भोसले या वेळी उपस्थित होते. या वेळी स्मारकाचे उर्वरित काम मार्गी लावण्यासाठी निधी मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा, मी त्याचा पाठपुरावा करीन, अशी सूचना पाटील यांनी पालिकेला केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या स्मारकाचे बाह्य काम पूर्ण करण्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

हे ही वाचा…कोथरुडमध्ये गुंगीचे ओैषध देऊन ज्येष्ठ महिलेची लूट

या कामांनाही मिळाली मान्यता

महात्मा फुले मंडईच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेने सव्वा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. यात प्रामुख्याने अतिक्रमणे हटविणे, गळक्या शेड्सची दुरुस्ती, पन्हाळी बसविणे ही कामे केली जाणार आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ७५ कोटी रुपयांच्या खर्चाला तर समाविष्ट २३ गावांमधील सांडपाणी व्यवस्थेसाठी २० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देखील देण्यात आली आहे, असेही आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.