लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : कमी किमतीत जमीन घेऊन एक ते दीड वर्षात दुप्पट भावाने विक्री करण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका व्यावसायिकाची एक कोटी २९ लाख ५० हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०२३ कालावधीत घडली.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Adulterated food pune, Food and Drug Administration pune, Diwali, Adulterated food,
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा लाखोंचा बाजार! पुणे विभागात दसरा, दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Estimated tax evasion of 25 thousand crores 18 thousand fake companies busted by GST authorities print eco news
तब्बल २५ हजार कोटींच्या कर-चोरीचा अंदाज; जीएसटी अधिकाऱ्यांकडून १८ हजार बनावट कंपन्यांचा छडा
swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Pune Diwali thief robbery, thief robbery pune,
पुणे : दिवाळी संपताच चोरट्यांचा धुमाकूळ, लुटमारीच्या घटना वाढीस

विशाल अशोक चुगेरा (रा. वानवडी), शिवम बनवारीदास महंत (रा. वडगाव शेरी), मनोज सरसनाथ राय (रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गिरीश आव्हाड (वय ४७, रा. बाणेर रस्ता, औंध) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-“२०० आमदार असूनही राज्य सरकार अस्थिर”, सुप्रिया सुळेंच्या विधानावर अजित पवार म्हणाले…

फिर्यादी आव्हाड आणि मनोज राय यांची १० ते १२ वर्षांपासून ओळख आहे. जुलै २०१९ मध्ये मनोजने शिवम, विशालची ओळख करून दिली. त्या वेळी त्यांनी हवेलीतील शिरसवाडी परिसरात असलेल्या प्लॉटिंगची विक्री सुरू असल्याचे सांगितले. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास दीड वर्षात दुप्पट भावाने जागेची विक्री करून देण्याचे आमिष त्यांनी दाखविले. त्यामुळे आव्हाड यांनी २०१९ मध्ये विशालच्या बँक खात्यात एक कोटी १० लाख रुपये आरटीजीएसद्वारे जमा केले.

शिवमला कमिशनपोटी १७ लाख, मनोजला अडीच लाख रुपये दिले. मात्र, काही दिवसांनी आव्हाड यांनी तिघांना संपर्क केला असता, त्यांनी जमीन नावावर करून देण्यास टाळाटाळ केली. प्लॉट खरेदीच्या नावाखाली तिन्ही आरोपींनी आव्हाड यांच्याकडून घेतलेले एक कोटी आणि कमिशन असे मिळून एक कोटी २९ लाख ५० हजारांची फसवणूक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.