माथाडी संघटनेच्या नावाखाली दोन लाख ९० हजारांची खंडणी उकळणाऱ्या एकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. खडकी रेल्वे स्थानकातील मालधक्का परिसरात ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा >>>पुणे : फेरफार अदालतीचे उद्या आयोजन ; प्रलंबित नोंदी निकाली काढण्याचे आवाहन

Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Nagpur jio tower scam loksatta news
जिओ टॉवर स्कॅम : देशभरातील हजारो नागरिकांना कोट्यवधीने गंडवणारी टोळी जेरबंद, कोलकातावरून सुरू होते…
Contract to supply manpower to Vitthal Rukmini Temple Committee cancelled
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला मनुष्यबळ पुरवठा करणारा ठेका रद्द; तक्रारींनंतर मंदिर समितीकडून कारवाई
Satara District Sessions Judge , pre-arrest bail ,
अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात
Asaram Bapu Interim Bail from Supreme Court
Asaram Bapu Bail: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
youth abused minor pune, gymnasium, Pune,
पुणे : व्यायामशाळेत अल्पवयीनावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला २० वर्ष सक्तमजुरी
minor boy killed by father and brother over talking to girl
पुणे : अल्पवयीन मुलाची हत्या; मुलीशी बोलत असल्याच्या रागातून दगडाने ठेचून खून

पप्पू भिवा खरात (वय ३६, रा. ओैंध) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत चाकण येथील एका खासगी कंपनीतील अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे. तक्रारदार एका लाॅजिस्टिक कंपनीत अधिकारी आहेत. संबंधित कंपनीकडून रेल्वेने आलेल्या मालाची वाहतूक केली जाते. खडकीतील मालधक्का परिसरातील रेल्वेने आलेल्या मालाची पोहोच संंबंधित कंपनीकडून केली जाते.

हेही वाचा >>>पुणे : सराफ बाजारात महिलेकडील सात लाखांचे दागिने चोरले

खरात याने माथाडी संघटनेच्या नावाखाली कंपनीतील अधिकाऱ्याला धमकावले. मालाची वाहतूक आमच्या संघटनेकडून करण्यात येईल, असे सांगून खरातने त्यांच्याकडून एक लाख ९० हजार रुपये खंडणी उकळली. त्यानंतर खरातने पुन्हा कामात अडथळा आणून एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी त्यांना देण्यात आली. त्यानंतर त्याला एक लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतरही खरातकडून धमकावण्यात येत होते. संबंधित अधिकाऱ्याने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. खरातला सापळा लावून पकडण्यात आले. खडकी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बोमदंडी तपास करत आहेत.

Story img Loader