पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात डोळे येण्याची साथ नियंत्रणात आली आहे. ऑगस्टपासून डोळे येण्याच्या प्रमाणात घट झाली. मात्र, साथीच्या आजारांनी शहरवासीय हैराण झाले आहेत. सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जुलैमध्ये आळंदी येथून सुरू झालेल्या डोळे येण्याच्या साथीचा ऑगस्टमध्ये शहरात वेगाने प्रसार झाला. प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक होते. विद्यार्थ्यांमध्ये संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी शाळांमध्येही तपासणी केली जात होती, मात्र लहान मुलांमध्ये असणाऱ्या संसर्गाचा प्रसार मोठ्यांमध्येही झाल्याने ऑगस्टमध्ये डोळे आलेल्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला होता.

ऑगस्टच्या तुलनेत या महिन्यात नागरिकांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण घटले आहे. आतापर्यंत ९६ रुग्णांची नोंद झाली आहे. या उलट गेल्या महिन्यात हे प्रमाण पाच हजारांच्या आसपास होते. यामुळे डोळे येण्याची साथ आटोक्यात आली असल्याचे दिसत आहे. एकीकडे डोळे येण्याची साथ आटोक्यात आली असली तरी दुसरीकडे साथीच्या आजारांनी शहरवासीय हैराण झाले आहेत. साथीच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सर्दी, ताप, खोकल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बदलेल्या वातावरणामुळे हे प्रमाण वाढत असून सर्व वयोगटांमध्ये सर्दी खोकल्याबरोबरच तापाचे रुग्ण आढळून येत आहेत.

fruit vendor in Bhandara assaulted minor boy in his godown few days ago
संतापजनक ! अल्पवयीन मुलासोबत गोडाऊनमध्ये केले अनैसर्गिक कृत्य ; अखेर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Delhi Crime Doctor Shot dead in Hospital
Doctor Murder : “शेवटी २०२४ मध्ये हत्या केलीच”, डॉक्टरच्या हत्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा गजाआड; सोशल मीडिया पोस्टही चर्चेत!
Five pistols seized from hotel worker in Shirur Pune print news
 शिरुरमध्ये हाॅटेल कामगाराकडून पाच पिस्तूल जप्त
gold price hike in during Navratri festival
ऐन नवरात्राच्या तोंडावर सोन्याच्या दरात बदल… आता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम…
cyclonic air condition developed over North Maharashtra forming low pressure belt to North Bangladesh
पुण्यात बुधवारी पडलेल्या पावसाने २१ सप्टेंबर १९३८ रोजीचा विक्रम मोडला; जाणून घ्या, सप्टेंबर महिन्यांतील आजवरच्या पावसाची आकडेवारी
Manufacturing and service sector activity limited in September print
निर्मिती, सेवा क्षेत्राच्या सक्रियतेला सप्टेंबर महिन्यात मर्यादा,सप्टेंबरमध्ये संमिश्र पीएमआय निर्देशांक २०२४च्या नीचांकावर
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड

हेही वाचा : पिंपरीत क्षेत्रीय कार्यालयांतर्गत गणेशमूर्ती संकलन केंद्र

‘शहरात डोळे येण्याची साथ आटोक्यात आली आहे. प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झाली आहे. वातावरणातील बदलामुळे साथीच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पाणी उकळून थंड करून प्यावे. तेलकट, थंड पदार्थांचे सेवन टाळावे. संतुलित आहार घ्यावा’, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी शहरवासीयांना केले आहे.