लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : निवडणूक आयोगाने विविध माध्यमांतून मतदार यादी शुद्धीकरणासाठी कार्यवाही सुरू केलेली आहे. त्यात पुणे जिल्ह्यात दुबार नाव नोंदणीचे २८ हजार, तर समान छायाचित्रांचे १ लाख ४२ हजार ३४९ मतदार आढळले असून, संबंधितांनी दुरुस्ती करून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने एकापेक्षा अधिक ठिकाणी समान छायाचित्र, एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारांच्या इतर माहितीमध्ये साधर्म्य आढळलेल्या किंवा दुबार नाव नोंदणी आढळलेल्या मतदारांना ‘नमूना अ’मध्ये नोटीस पाठविल्या आहेत.
भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम १७ व १८ नुसार एका मतदाराची मतदार यादीमध्ये एकच नोंद असणे, निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदार यादी त्रुटीरहीत असणे आवश्यक आहे. मात्र, काही मतदारांचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंद असल्याचे आढळले आहे. त्यामुळे संबंधित मतदारांना दुरुस्ती करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. नोटिशीवरील पर्याय निवडून १ जानेवारी २०२४ पर्यंत दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
आणखी वाचा-सारथी संस्थेला कोल्हापुरात जागा, खंडपीठासाठीचे आरक्षण हटवले
या नोटिशीद्वारे कोणत्या एका ठिकाणी नाव अपेक्षित आहे, हे ठरविण्याचा अधिकार मतदाराला दिला आहे. संबंधित मतदाराने ज्या ठिकाणी त्याचे नाव असणे त्यांना स्वतःला अभिप्रेत आहे त्या ठिकाणी बरोबरची खूण करावी आणि दिलेल्या ईमेल पत्त्यावर आधारकार्डच्या छायाप्रतीसह अपलोड करावे किंवा संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची भेट घेवून त्यांच्यामार्फत पुष्टीकरण पत्रावर कार्यवाही करणे आवश्यक आहे. या मोहिमेनंतर दोन ठिकाणी मतदाराचे नाव आढळल्यास निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.