पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वाढदिवस भाजपा कार्यकर्त्यांकडून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हा दिवस काँग्रेसकडून ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून पाळला जात आहे. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पंतप्रधान मोदी ओबीसी नाहीत, त्यांनी खोटी जात सांगितली असल्याचे म्हणत टीका केली आहे. काँग्रेसच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“अजित पवारांना खूप वेळ आहे, ते असे…” ; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला टोला!
पुण्यात माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “काँग्रेस आपली जागा शोधत आहे. कारण, ते जनतेत नाहीत आणि संसदेतही नाहीत. काँग्रेसचं अस्तित्व कमीकमी होत आहे. त्यामुळे त्यांनी एकच धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे, ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करणे. मला असं वाटतंय की देशातील लोकांनी चित्त्यांचं स्वागत केलं आहे. मात्र काँग्रेसमध्ये केवळ नकारात्मकता भरलेली आहे.”
पाहा व्हिडीओ –
तर, “नाना पटोले हे दिवसभर अशा काही गोष्टी बोलत असतात, त्या गांभीर्याने घ्यायच्या नसतात. त्यामुळे तुम्ही देखील गांभीर्याने घेऊ नका. नाना पटोलेंना असे झटके येत असतात. त्यामुळे ते असे काही काही बोलत असतात.” असं म्हणत त्यांनी नाना पटोलेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.