पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत दोघांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुजित शिवाजी साळुंखे (वय २५, रा. अकोले खुर्द, ता. माढा, जि. सोलापूर), शरद नागनाथ माने (वय २६, रा. वडोली, ता.माढा, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुजीत साळुंखे, शरद माने पुणे ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रियेत सहभागी झाले होते. पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत दोघांनी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केले होते. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बीडमधील जिल्हा पुर्नवसन अधिकारी कार्यालयातून घेतल्याचे दोघांनी भासविले होते. भरती प्रक्रियेत आरोपी साळुंके, माने यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे तपासणीत उघडकीस आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्र तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake certificate for police recruitment crime against two candidates pune print news rbk 25 ysh
Show comments