पुणे : ससून रुग्णालयातून वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांचे शिक्के चोरुन बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करणाऱ्या एकास अटक करण्यात आली. ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी पाळत ठेऊन आरोपीला पकडले. आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. शैलेश शिवशंकर दामशेट्टी (वय २६, रा.रास्ता पेठ) यांनी याबाबत बंडागर्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रकाश पांडुरंग मोंडकर (रा.कणकवली, सिंधुदूर्ग) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार सत्पाल पवार (रा.कराड, सातारा) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पुण्यात चौथ्या विश्वविक्रमाची नोंद; दुसऱ्यांदा चीनला पछाडले

Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Mumbai ED filed supplementary charge sheet against OctaFX and other related entities
ऑक्टाएफएक्स प्रकरण : ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, देशातील व्यवहारांतून ८०० कोटी जमा केल्याचा आरोप
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

ससून रुग्णालयातून १४ डिसेंबर रोजी वैद्यकीय अधिक्षकांच्या कार्यालयातून दोन शिक्के चोरीला गेले होते. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासण्यात आले. तेव्हा चित्रीकरणात मोंडकर आढळून आला. प्रमापणत्रावर वैद्यकीय तज्ज्ञांची स्वाक्षरी केली जाते. त्यामुळे आरोपी स्वाक्षरी घेण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात येईल, याची खात्री वैद्यकीय तज्ज्ञांना होती. मोंडकरने बनावट प्रमाणपत्र (फिटनेस सर्टीफिकेट) तयार केले. बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी तो वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात आला. वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले. सत्पाल पवार मुख्य आरोपी असून त्याने मोंडकर आला मुंबईतील बेस्टमध्ये कामाला लावतो असे सांगून एक लाख रुपये उकळले होते. त्यानंतर त्यांनी ससूनमधून वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी शिक्के चोरुन नेले. या शिक्क्यांचा आणखी कोठे वापर करण्यात आला आहे का ? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करत आहेत.

Story img Loader