पुणे : विधानसभा निवडणुकीत आठ शहरी मतदारसंघात ६०० हून अधिक बनावट (टेंडर) मतदान झाले आहे, तर ३०० मतपत्रिकां बाद करण्यात आल्या आहेत. सर्वाधिक १६२ बनावट आणि ६५ मतपत्रिका वडगाव शेरी मतदारसंघातून मतदान बाद केले आहे., त्या खालोखाल कोथरूड मतदारसंघातील ९३ बनावट, तर १८ मतपत्रिका मतमोजणीवेळी बाद केल्या आहेत. विशेषतः लोकसभा निवडणुकीपासून बनावट मतदानाचे प्रकार वाढले असून, विधानसभा निवडणुकीत या मतदारांची संख्या वाढल्याचे निरीक्षण जिल्हा निवडणूक प्रशासनाने नोंदवले.

पुणे शहरात वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँटोन्मेंट आणि कसबा पेठ असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांसाठी शनिवारी मतमोजणी प्रक्रिया झाली.  विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यात मोठ्या मताधिक्याचा फरक असल्याने कोणालाही बनावट मतदानाची आवश्यकता भासली नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून बनावट मतदानाचे प्रकार वाढले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!

हेही वाचा >>> वारजे पुलाजवळ गॅस टँकर उलटला, चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; सायंकाळनंतर वाहतूक सुरळीत

वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक १६२ मते बनावट आहेत. त्यापाठोपाठ कोथरूड मतदारसंघात ९३, हडपसर मतदारसंघात ७८, खडकवासला ७५, पर्वती ६१, शिवाजीनगर आणि पुणे कँटोन्मेंट मतदारसंघात प्रत्येकी ४९ आणि कसबा मतदारसंघात ५२ असे एकूण ६१९ मतदान बनावट झाले आहे. हे मतदार मतदान केंद्रात येण्यापूर्वीच त्यांच्या नावाने मतदान करून गेले असल्याचे आढळून आले. संबंधित मतदारांनी दाखविलेल्या कागदपत्रांनुसार मतदानाचा हक्क बजावता आला असला, तरी निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवाराला या मतदानाचा फायदा झालेला नाही. परिणामी या मतदारांचा मतदानाचा हक्क बजावूनही हे मतदान निरूपयोगी ठरले आहे.

काय आहे बनावट (टेंडर व्होट) मतदान ?

एखादा मतदार मतदान केंद्रावर जाण्यापूर्वीच त्याच्या नावाने दुसऱ्या कोणीतरी मतदान करून गेल्याचे आढळून येते. अशा वेळी संबंधित मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता येतो. निवडणूक अधिकाऱ्याकडे १७ ब क्रमांकाचा तक्रार अर्ज करून मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र, निकालावर परिणाम करण्याएवढी अल्प तफावत असल्यास हे मतदान विचारात घेऊन मतांची मोजणी करण्यात येते.

३०० मतपत्रिका बाद

निवडणूक काळात कर्तव्यावर असलेल्या मतदारांना, तसेच ८५ वर्षांपुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदार, लष्करी सेवेत कर्तव्यावर असलेल्या जवानांना टपाली मतदानाचा अधिकार आहे. शहरासह जिल्ह्यातून ३४ हजार टपाली मतदान झाले होते. लष्करी सेवेतील एक हजारांहून अधिक मतदारांनी इलेक्ट्राॅनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट (ईटीपीबीएस) प्रणालीद्वारे टपाली मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी ३०० मतपत्रिका बाद करण्यात आल्या आहेत. यामध्ये वडगावशेरी मतदारसंघातील सर्वाधिक ६५ टपाली मतपत्रिका बाद करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ हडपसर ५६, खडकवासला ५३, शिवाजीनगर ४१, पर्वती आणि पुणे कँटोन्मेंट प्रत्येकी ३४, कोथरूड १८ आणि कसबा २० असे एकूण ३२१ मतपत्रिका बाद करण्यात आल्या आहेत.

Story img Loader