पुणे : ‘नादातूनी या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम’ या नाम गजरातून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध संगीतकार-गायक किशोर कुलकर्णी (वय ६०) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

पं. यशवंतबुवा मराठे आणि महंमद हुसेन खान यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतलेल्या किशोर कुलकर्णी यांना पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून सुगम संगीताचे मार्गदर्शन मिळाले. लता मंगेशकर यांचा त्यांना प्रदीर्घ सहवास लाभला. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘भावसरगम’ आणि ‘शिवकल्याण राजा’ या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. तर, त्यांच्या रचनांवर आधारित ‘दिन तैसी रजनी’ या कार्यक्रमाचे ते संगीतकार आणि निर्माते होते.

article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
srikant gadre pune marathi news
‘घाशीराम’मधील गणपती श्रीकांत गद्रे यांचे निधन
Film critic Aruna Vasudev passed away
चित्रपट समीक्षक अरुणा वासुदेव यांचे निधन
kedar shinde share special post for grandfather shahir sable on him birth anniversary
“बहुजन समाजातून आल्याने…”, शाहीर साबळेंच्या जयंतीनिमित्ताने नातू केदार शिंदेंनी खास पोस्ट लिहित व्यक्त केली खंत
Composer Avadhoot Gupte visit to Malgaon High School
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांची आजोळच्या मळगाव हायस्कूलला भेट
Death anniversary of film industry actor director singer M Vinayak
मला उमगलेले माझे दादा!
Loksatta lokrang Dipa Deshmukh book Directors published by Manovikas Prakashan
भारतीय दिग्दर्शकांची गौरवशाली परंपरा

हेही वाचा – भाजपावर टीका करत शरद पवार म्हणाले, “राज्यकर्त्यांकडून आदिवासींना ‘वनवासी’ संबोधून दिशाभूल…”

हेही वाचा – राजकारणातही ‘काका मला वाचवा’ असा आवाज…

स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्यावरील रचना कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केल्या होत्या. कवी ग्रेस यांच्या कविता स्वरबद्ध करून त्यावर आधारित ‘ग्रेसफुल’ या कार्यक्रमाची निर्मिती त्यांनी केली होती. गेली काही वर्षे ते नवोदितांना संगीत मार्गदर्शन करत असत.