लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर परिसरात एका शेतातील उसाच्या पाचटाला अज्ञाताने आग लावली. आगीत उसाला पाणी देण्यासाठी बसविण्यात आलेले शेतातील ठिबक सिंचन पाइप जळाले असून शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत संभाजीराव कुंजीर (वय ७३. रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुंजीर यांची थेऊर परिसरातील जाधव वस्ती येथे शेती आहे. कुंजीर यांनी उस लागवड केली आहे. उसाला पाणी देण्यासाठी कुंजीर यांनी ठिबक सिंचन केले होते. उस साखर कारखान्यात पाठविण्यात आल्यानंतर कुंजीर यांच्या शेतात पाचट होते. मध्यरात्री अज्ञाताने पाचटाला आग लावली. आगीत पाचट जळाले तसेच दीड लाख रुपयांचे ठिबक सिंचनाचे प्लास्टिक पाइप जळाले. पोलीस हवालदार जगताप तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer huge loss because of fire in farm pune print news rbk 25 mrj