जेजुरी: पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील जगताप वस्तीवर शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पाळीवरून वाद होवून एका शेतकऱ्याचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेत अविनाश मल्हारी जगताप यांचा खून झाला  आरोपी बाळूदास काळूराम जगताप (वय ५५,  रा. आंबळे. ता पुरंदर,जि.पुणे) याला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे.जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आंबळे हद्दीतील जगताप वस्ती येथे अविनाश मल्हारी जगताप यांची शेतजमीन आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 त्यांचा शनिवारी (दि.१५) सकाळी नऊ वाजता शेतातील विहिरी मधील पाण्याच्या पाळीवरून आरोपी बाळूदास जगताप यांच्याबरोबर वाद झाला. यावेळी आरोपीने खिशातील चाकू काढून अविनाश जगताप यांचेवर धारदार चाकूने चार ते पाच वार केले.या हल्ल्यात अविनाश जगताप यांचा मृत्यू झाला . यावेळी या ठिकाणी उपस्थित उपस्थित असणारे अविनाश जगताप यांचे वडील मल्हारी जगताप,गणेश जगताप यांच्यावरही आरोपीने चाकूने वार करून दोघांना गंभीर जखमी केले. याबाबत सौरभ दत्तात्रय जगताप यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान.या घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस  ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे,पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महेश पाटील,पोलीस हवालदार दशरथ बनसोडे ,विठ्ठल कदम यांनी घटनास्थळी जावून पळून जाण्याचा तयारीत असणाऱ्या आरोपीला जेरबंद केले.जेजुरी पोलिसांनी आरोपी काळूदास जगताप यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer murdered over well water distribution dispute pune print news amy