बारामती : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ भागातील २७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, याबाबत बोलताना माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार म्हणाले, ” राज्यातील शेतकऱ्यांची वाढती आत्महत्या ही चिंताजनकच बाब आहे,” याबाबत सरकारने माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबाबत योग्य धोरण आखावे, बारामती दौऱ्यावर जेष्ठ खासदार शरद पवार आले असता पत्रकारांनी आज त्यांच्याशी संवाद साधला.
येत्या सोमवारी १७ मार्चपासून संसदीय कामकाज सुरू होत असून या संदर्भात आम्ही लक्ष घालू आवश्यक ते मुद्दे मांडू, असे ही शरद पवार यांनी यावेळी सांगितले, राज्यातील वातावरण धार्मिक स्वरूपाचे होत आहे, होळीचा सण आणि थोर राष्ट्र पुरुषांचा अपमान होताना दिसत आहे, यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ” काहीजण परिस्थितीचा गैरफायदा घेताना दिसत आहेत, राज्य सरकारने याबाबत बघायची भूमिका न घेता राज्याच्या हितासाठी काम करावे.
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे, यामध्ये महाराष्ट्रात पूर्वी महाआघाडीचे सरकार असताना दोन लाख कोटीचे कर्ज होते, आज महायुतीच्या सरकारमध्ये राज्यावर साडेनऊ लाख कोटीचे कर्ज होत आहे ? या प्रश्नाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, माझ्याकडे अर्थसंकल्पाच्या प्रती आलेली नाही, ती आल्यानंतर वाचून त्याबाबत अधिक बोलणे उचित ठरेल.
आज बीडची गुन्हेगारी परिस्थिती खूपच वाढताना दिसती आहे, धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी, या घटनेतील फोटो, चित्रफिती हे जेव्हा प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे, या घटनेमध्ये कायदेशीर कारवाईलाच उशीर झाला असं आपणास वाटते ? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “मी बीड जिल्ह्याला अनेक वर्षापासून ओळखतो, आजची अवस्था आहे अशी अवस्था यापूर्वी कधीही बीडची झालेली नव्हती, समजुतीच्या विचाराने सर्वांना पुढे घेऊन जाणारा बीड जिल्हा आहे, असा माझा बीड जिल्ह्या बाबतचा अनुभव आहे, तेथे सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका काही लोकांनी घेतल्यामुळे आज बीडची अशी परिस्थिती आहे, राज्य सरकारने याकडे लक्ष घालून जे बेकायदेशीर पद्धतीने काम करीत आहे त्यांच्या विरोधात सक्त कारवाईची भूमिका घेतली पाहिजे, आणि यापुढे आता बीडला वैभवाचे दिवस कसे येतील, याकडे लक्ष घालण्याची गरज आहे,असे मला वाटते.
ए आय ऊस उत्पादनामुळे नवीन क्रांती घडवेल – शरद पवारांना विश्वास
वसंतदादा इन्स्टिट्यूट व कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि कृषी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त माध्यमातून ए आय ऊस उत्पादनामुळे उसाच्या धंद्यामध्ये नवीन क्रांती घडेल, यामुळे उसाचा धंदा अधिक सोयीस्कर होण्यास मदत होईल, आम्ही यासाठी बरेच दिवस प्रयत्न करीत होतो, आज महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने हे यांच्या सूचनेनुसार हे उसाचे वाण आम्ही तयार करीत आहोत, याला पाणी कमी लागते, साखरेचे उत्पादन चांगले येते, आणि उसाचा धंदा सोयीस्कर होण्यास मदत होते, महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखाने यामध्ये समाविष्ट होत असून दक्षिण महाराष्ट्रातील बहुसंख्य साखर कारखान्याचे यामध्ये सहभाग राहणार आहे, असे श्री.पवार यांनी सांगितले.
ऊस उत्पादनाच्या क्षेत्रात कृत्रिम तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावेल आणि हा निर्णय शंभर टक्के क्रांतिकारक ठरेल, असे श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.