खास आषाढी एकादशीसाठी कष्टाने पिकविलेली रताळी अपेक्षेप्रमाणे विक्री होत नसल्यामुळे करमाळा जिल्ह्यातील शेतकरी तीन दिवसांपासून पुणे बाजार समितीत ताटकाळत राहिले आहेत. मंगळवारी पहाटे बाजार समितीत रताळ्यांचे ट्रक घेऊन आलेले शेतकरी गुरुवारी सायंकाळपर्यंत विक्रीच्या प्रतीक्षेतच होते. आणलेल्या सर्व रताळ्यांची विक्री होण्यासाठी त्यांना शनिवार उजाडणार आहे. पावसाच्या रिपरिपीत, थंडी-वाऱ्यात अन् डासांच्या घोंगावात शेतकरी बाजार समितीत तळ टाकून आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त बहुतेक जण उपवास करीत असल्यामुळे रताळ्यांना चांगली मागणी असते. वाढीव दरही मिळतो, म्हणून शेतकरी आषाढी एकादशीला काढणीला येतील असे नियोजन करून रताळी लागवड करतात. असेच नियोजन करून सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील आठ-दहा शेतकरी मंगळवारी (५ जुलै) पहाटे चार ट्रक रताळी घेऊन पुणे बाजार समितीत दाखल झाले. मागील वर्षी टाळेबंदी असल्यामुळे अपेक्षित दर मिळाला नव्हता, यंदा तरी चांगला दर मिळेल, रताळ्यांचा उठाव होईल, अशी अपेक्षा ठेवून हे शेतकरी पुण्यात आले होते. पण, गुरुवारी सायंकाळपर्यंत आणलेल्या रताळ्यांपैकी निम्मी रताळीही विकली गेली नाहीत.
रताळ्यांचा घाउक विक्रीचा दरही ३०-३२ रुपये प्रति किलो इतकाच मिळत आहे. करमाळ्यातील शेतकऱ्यांची सर्व रताळी विक्री होण्यासाठी शनिवारचा दिवस उजाडण्याची शक्यता आहे. मागील तीन दिवसांपासून हे आठ-दहा शेतकरी पावसाच्या रिपरिपीत, थंडी-वाऱ्यात अन् डासांच्या घोंगावात बाजार समितीत तळ ठोकून आहेत. त्यांना धड रताळी रचून ठेवलेल्या ठिकाणांहून जाताही येत नाही आणि रताळीही विक्री होत नाहीत. अशा कात्रीत हे शेतकरी अडकून पडले आहेत.
आवक सरासरी, पण मागणीचा अभाव –
बाजार समितीत तीन दिवसांत ४० किलोची सुमारे आठ हजार पोती रताळ्यांची आवक झाली आहे. गुरुवारी कर्नाटकातून संकरित आकाराने मोठी असलेल्या रताळ्यांची आवक झाली आहे. शनिवारपर्यंत दहा हजार पोत्यांवर आवक जाण्याची शक्यता आहे. पण, कर्नाटकच्या रताळ्यांना मागणी कमी असते. करमाळ्याच्या रताळ्यांचा दर्जा चांगला असूनही अपेक्षित वेगाने विक्री होत नाही. अडते असोशिएशनचे माजी अध्यक्ष अमोल घुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा गुरुवारपर्यंत रताळ्यांच्या मागणीत फारशी वाढ दिसली नाही. दर वर्षी संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि काही प्रमाणात विदर्भातील व्यापारी पुण्यातून रताळी खरेदी करतात. यंदा फक्त औरंगाबाद येथील व्यापाऱ्यांनी रताळ्यांची खरेदी केली आहे.
दर आणि आवक सरासरीइतकी असतानाही मागणी का नाही, हेच कळत नाही –
“कष्टाने पिकवलेला शेतीमाल विक्री करण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. दर आणि आवक सरासरीइतकी असतानाही मागणी का नाही, हेच कळत नाही. पावसाची रिपरिप सुरू असल्याने किरकोळ ग्राहक घराबाहेर पडत नाहीत. व्यापारीही दबकून खरेदी करत आहेत. किमान आषाढी एकादशीचा उपवास घरी जाऊन करता यावा, इतकीच अपेक्षा आहे.” असं करमाळा येथील शेतकरी सिद्धार्थ कांबळे यांनी सांगितलं आहे.