पुणे : राज्याच्या महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रकल्पांतर्गत आता डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उताऱ्यांबरोबरच (गाव नमुना क्रमांक आठ-अ) मिळकतपत्रिका डाउनलोड करण्यावर नागरिकांकडून भर देण्यात आला आहे. या सुविधेचा वापर करून ३ एप्रिल रोजी एका दिवसात तब्बल एक लाख ६१ हजार ४७२ डिजिटल कागदपत्रे डाउनलोड केली आहेत. परिणामी नव्या आर्थिक वर्षाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनाला ३१ लाखांपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमध्ये सात वर्षांत दीड लाख नवीन मालमत्ता; गेल्या वर्षभरात २६ हजार मालमत्तांची भर

ई-फेरफार प्रकल्पांतर्गत आतापर्यंत फक्त डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि आठ-अ उतारे नागरिकांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होते. मिळकत पत्रिकादेखील आता मिळू लागली आहे. सरकारी योजनांचा लाभ, पीककर्ज, जमिनीची खरेदी विक्री यासाठी सातबारा उताऱ्यांबरोबर खाते उतारे हे आवश्यक असतात. हे खाते उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त मिळू लागले आहेत. ऑनलाइन डिजिटल सातबारा, आठ-अ किंवा फेरफार उतारा डाउनलोड करण्यासाठी प्रति उतारा १५ रुपये शुल्क आकारले जाते, तर एका मिळकत पत्रिकेसाठी १३५ रुपये शुल्क आकारले जाते. त्यानुसार ३ एप्रिल रोजी एका दिवसात एक लाख १७ हजार डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा, ३५ हजार आठ-अ उतारे, २४६२ डिजिटल स्वाक्षरीयुक्त फेरफार आणि ५८९२ डिजिटल स्वाक्षरीयुक्त मिळकत पत्रिका आहेत, अशी माहिती ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.