बोटातली नाजूक अंगठी, डोक्यावरची नक्षीदार बिंदी, ठसठशीत कंबरपट्टा, नक्षीदार नेकलेस या दागिन्यांपासून ते आधुनिकतेशी नाते सांगणारा मोबाईल, लॅपटॉप यांना हलव्याचा साज लाभला. हलव्याच्या दागिन्यांचा मननोहक साज रॅम्पवर अवतरला तेव्हा हे दागिने परिधान करणाऱ्या मॉडेलचे रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
पाटणकर खाऊवाले यांच्यातर्फे आयोजित हलव्याच्या दागिन्यांच्या फॅशन शोमध्ये ‘रमा-माधव’फेम पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे हे कलाकार हलव्यांचे दागिने परिधान करून मॉडेल्ससमवेत रॅम्पवर उतरले होते. रमेश पाटणकर आणि सोनिया पाटणकर या वेळी उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेत्यांना या कलाकारांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
पाटणकर म्हणाले, ‘मानवी नात्यांमधील स्नेह द्विगुणित करणाऱ्या या सणाला हलव्याच्या दागिन्यांचा साज मिळणे हे मराठी संस्कृतीच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. या फॅशन शोच्या माध्यमातून हलव्याच्या दागिन्यांची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. या स्पर्धेला देशभरातून आणि परदेशातूनही उत्तम प्रतिसाद लाभतो.’
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : बाळाचे बोरन्हाण : पुणे विभाग : प्रथम – अन्वित हर्डीकर, द्वितीय – पार्थ दिघे, तृतीय – स्वरा देसाई, महाराष्ट्र विभाग : क्रिशा देसाई, परदेशातील विजेता – रुद्रांश ठकार, सुनेचे तिळवण : पुणे विभाग : प्रथम – सुप्रिया तापकीर, द्वितीय – श्रद्धा ढमढेरे, तृतीय – अस्मिता महाजन, परदेशातील विजेती – सारिका कानिटकर, जावयाचे प्रथमवाण : हिमांशू जैन, परदेशातील विजेता – अमेय कानिटकर.
हलव्याच्या दागिन्यांचा साज रॅम्पवर अवतरला
हलव्याच्या दागिन्यांचा मननोहक साज रॅम्पवर अवतरला तेव्हा हे दागिने परिधान करणाऱ्या मॉडेलचे रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
Written by दिवाकर भावे
आणखी वाचा
First published on: 25-11-2015 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion show for halva jewellary by patankar khauvale