पुणे : महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त साबुदाणा, शेंगदाणा, भगरीला मागणी चांगली आहे. मागणी वाढल्याने साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या दरात वाढ झाली असून भगरीचे दर स्थिर आहेत. त्यामुळे यंदाचा महाशिवरात्रीचा उपवास महाग पडणार आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत घाऊक बाजारात साबुदाण्याच्या दरात क्विंटलमागे ८०० ते एक हजार रुपये,तसेच शेंगदाण्याच्या दरात १५०० ते दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. महाशिवरात्रीला अनेक जण भक्तिभावाने उपवास करतात. उपवासासाठी साबुदाणा, भगर आणि शेंगदाण्याला मागणी वाढली आहे. ग्राहकांकडून असलेली मागणी विचारात घेऊन व्यापारी साबुदाणा, शेंगदाणा, भगर खरेदी करतात. मागणीत वाढ झाल्याने साबुदाणा, शेंगदाण्याच्या दरात वाढ झाली असून भगर स्थिर असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.
मार्केट यार्डातील भुसार बाजारात तामिळनाडूतून साबुदाण्याची आवक होते. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधून शेंगदाण्याची आवक होते. नाशिक भागातून भगरची आवक होते. दरवर्षी जून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत शेंगदाण्याला मागणी असते. घरगुती ग्राहक तसेच हाॅटेल व्यावसायिकांकडून शेंगदाणा तेलाचा वापर केला जातो. शेंगदाण्याला मागणी वाढल्याने दरात वाढ झाली असल्याचे व्यापारी नितीन चोरडिया यांनी सांगितले.
भगरीला तृणधान्य घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे भगरीच्या मागणीत वाढ झाली आहे. बाजारात भगर, साबुदाण्याची आवक चांगली होत आहे. साबुदाण्याच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे व्यापारी आशिष दुगड यांनी नमूद केले.
हेही वाचा – तुमच्याकडे अग्निशमन यंत्रणा आहे का? नसेल तर..
किरकोळ बाजारातील किलोचा दर
घुंगरू शेंगदाणा – ११० ते १३० रुपये
स्पॅनिश शेंगदाणा – १३० ते १४० रुपये
भगर – १२० ते १३५ रुपये
साबुदाणा – ८५ ते ९० रुपये
साबुदाणा, शेंगदाणा दरवाढ का?
हेही वाचा – साहित्य अकादमी नोकरशहा चालवतात!, महेश एलकुंचवार यांचे परखड मत
साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या उत्पादनात यंदा घट झाली आहे. हवामानातील बदलांमुळे उत्पादन घटले आहे. शेंगदाण्याचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. नवीन शेंगदाण्याची आवक होण्यास काही दिवस लागणार आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात शेंगदाण्याचा तुटवडा जाणवत आहे. गुजरातमध्ये शेंगदाण्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. गुजरातमधून शेंगदाण्याची निर्यात वाढली आहे.