पोटाचा घेर असणे किंवा ढेरी हे पुरुषांच्या जाडपणाचे लक्षण मानले जाते. पण, केवळ जाड असणे हाच निकष मानला तर, स्थूलतेमध्ये पुण्यातील महिलांनी पुरुषांवर मात केली आहे. एक हजार व्यक्तींच्या तपासणीनंतर हे निरीक्षण समोर आले आहे.
इन्स्टिटय़ूट ऑफ एक्सरसाइज अॅन्ड स्पोर्ट्स सायन्सेस (इंडिया) प्रा. लि. या संस्थेने शहराच्या विविध भागातील १ हजार ३४ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्याद्वारे हा निष्कर्ष समोर आला आहे. दहापैकी सहा व्यक्ती या पोट सुटलेल्या असल्याचे आढळून आले आहे. महिलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेमध्ये अधिक आहे. वयाची चाळिशी पार केलेल्या व्यक्तींमध्ये स्थूलतेचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. गरजेपेक्षा अधिक जेवण, रात्री उशिरा आणि अधिक जेवण, जेवणासमवेत केलेले थंड पाणी आणि अपेयपान, व्यायामाचा अभाव ही साधारणपणे स्थूलतेची कारणे आहेत. ही स्थूलता माणसाला मधुमेही बनविण्यास कारणीभूत ठरू शकते, अशी माहिती संस्थेचे संचालक रूपेश अंकोलीकर यांनी मंगळवारी दिली.
संस्थेतर्फे मिटकॉनच्या सहकार्याने ‘हेल्थ अॅन्ड फिटनेस फॉर ऑल’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘फिटनेस’ आणि ‘डिफिट डायबेटिस’ असे प्रत्येकी एक महिना कालावधीचे दोन कार्यक्रम होणार असून एका बॅचमध्ये २५ ते ३० जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ७७०९०१२१६६ या मोबाइल क्रमांकावर आपले नाव आणि कोणत्या कार्यक्रमाला प्रवेश हवा आहे, या विषयीचा ‘एसएमएस’ करावयाचा आहे, असे अंकोलीकर यांनी सांगितले.
स्थूलतेमध्ये महिलांची पुरुषांवर आघाडी!
पोटाचा घेर असणे किंवा ढेरी हे पुरुषांच्या जाडपणाचे लक्षण मानले जाते. पण, केवळ जाड असणे हाच निकष मानला तर, स्थूलतेमध्ये पुण्यातील महिलांनी पुरुषांवर मात केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-07-2014 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fat fitness health diabetes