पुणे : रात्रीच्या वेळेस हडपसर उड्डाणपुलावर जात असताना दुभाजक दिसला नसल्याने कंटनेर चालकाने वाहन दुभाजाकला धडकवले. त्यामुळे कंटनेरमध्ये असलेले अती जड लोखंडी पाईप पुढे केबिनवर सरकले आणि पाईप केबिनचा चेंदामेंदा करत कंटनेरच्या पुढे जाऊन रस्त्यावर पडले. त्या दरम्यान कंटेनर पलटी झाला. यामध्ये केबिनमधील चालक गंभीर जखमी झाला असून नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. रात्रीच्या तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर वाहतूक कोंडी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हनुमंत लक्ष्मण सानप ( वय ४२, सोताडा ता. पोटादा जि. बीड ) असे जखमी झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.  रविकांत दादासाहेब कचरे ( वय ३३, हडपसर पोलीस ठाणे ) यांनी फिर्याद दिली आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले म्हणाले की, पहाटे तीन वाजता लोखंडी पाईप घेऊन कंटेनर सोलापूरच्या दिशेने जात होता, कंटेनर वैभव चित्रपटगृहासमोर आला असता चालकाला हडपसर उड्डाणपुलाचा दुभाजक दिसला नाही. त्यामुळे गाडी दुभाजकला धडकली.

हेही वाचा >>>> बंद केलेल्या अनुदानित आश्रमशाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मात्र, त्या धडकेमुळे कंटेनरच्या मागे असलेले प्रत्येकी पाच टन वजनाचे चार लोखंडी पाईप हे सरकून पुढे आले. ते थेट केबिन तोडून रस्त्यावर पडले. त्यामुळे केबिनचा चेंदामेंदा झाला आणि कंटेनर पलटी झाला. यामध्ये चालत्च्या पायाला आणि हाताला गंभीर मार लागला. गंभीर अपघात झाल्याचे समजताच तेथून जाणाऱ्या इतर वाहनांच्या चालकांनी गाडी थांबवून कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी क्रेंनच्या सहायाने कंटेनर व लोखंडी पाईप बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fatal accident of container hitting divider pune print news vvk 10 ysh
Show comments