नारायणगाव : नगर-कल्याण महामार्गावरील वाटखळ गावाजवळ इनोव्हा आणि पिकअप टेम्पो यांच्यात भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.इनोव्हा गाडी (क्रमांक एम एच ०५ ए.एस ६३३७ ) व मालवाहू पिकअप टेम्पो ( क्रमांक एम एच १४ जी.डी ४०७४ ) या वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी आहे.

अपघाताची माहिती समजताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांची पोलीस पथकासह घटनास्थळी गेले आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना ओतूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले , मात्र त्यातील पाच जणांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.

how to check car tyre conditions tips to know tyre air pressure car tips
‘या’ गोष्टींकडे करू नका अजिबात दुर्लक्ष! नाहीतर चालत्या गाडीचा फुटेल टायर…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
driver accused of biker murder in pune
मोटरचालकाची मुजोरी; दुचाकीस्वार तरुणाला फरफटत नेले; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोटारचालक अटकेत
akola terrible accident on Apatapa road killed one and injured six on Friday night
रस्त्यावरील उभ्या ट्रॅक्टरमुळे घात; एक ठार, सहा जखमी…
in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
Mumbai western expressway loksatta news
मुंबई : दुभाजक ओलांडून कारची बसला धडक; पश्चिम द्रुतगतीमार्गावर अपघात, कार चालकाचा मृत्यू
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Nashik-Gujarat highway Accident
Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , रात्री ९ वाजता माळशेज घाट परिसरात असणाऱ्या वाटखळे गावाजवळ पिकअप आणि इनोव्हा गाडीची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की, इनोव्हा गाडीत असणाऱ्या सहापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात पिकअप चालक थोडक्यात बचावला आहे. वाहनांचा वेग इतका प्रचंड होता की इनोव्हाची एअर बॅग तुटून बाजूला पडली आहे.इनोव्हा गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने जुन्नर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आहे. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

Story img Loader